नगरसेवक श्रीकांत देशमुख यांची लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्यासोबत विकासात्मक चर्चा

नगरसेवक श्रीकांत देशमुख यांची लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्यासोबत विकासात्मक चर्चा
गडचिरोली ,
गडचिरोली–चिमूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांची सर्किट हाऊस, गडचिरोली येथे नगरसेवक श्रीकांत देशमुख यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी शहर व प्रभागातील विविध विकासात्मक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
नागरिकांच्या समस्या, प्रलंबित कामे, स्वच्छता, पायाभूत सुविधा तसेच शिक्षणाशी संबंधित मुद्दे खासदारांसमोर मांडण्यात आले. खासदार डॉ. किरसान यांनी संबंधित विषयांचा योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
स्थानिक प्रतिनिधी आणि खासदार यांच्या समन्वयातून विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments