चामोर्शी शहरात जळावू लाकूड बीट व बांबूची व्यवस्था करा - नगरसेवक आशीष पिपरे यांची मागणी.
चामोर्शी,
दिनांक २ फेब्रुवारी २०२३ चामोर्शी
येथे अनेक महिन्यांपासून जलावू लाकूड बीट व बांबू उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य गोरगरीब जनतेला विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमासाठी खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे, याकडे अजूनपर्यंत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही,
व सबंधित लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे, सर्वसामान्य गोरगरीब जनतेला छोट्या छोट्या कार्यक्रमासाठी जलावू लाकूड बीटची नितांत आवश्यकता आहे, सर्वसामान्य गोरगरीब जनतेला गॅस खरेदी करून लग्न , बारसे, विविध, धार्मिक सामाजिक कार्यक्रमासाठी जेवण तयार करणे आवश्यक असते परंतु निस्तार डेपोत जलावू लाकुड बीट उपलब्ध नसल्याने खरेदी करणे शक्य नाही .
ज्याप्रमाणे घोट येथील नी बारमाही लाकूड बीट उपलब्ध असते
त्याच प्रमाणे चामोर्शी येथे सुद्धा बारमाही जलावू लाकूड बीट उपलब्ध करून देण्यात यावे तसेच अनेक वर्षांपासून शहरातील वनविभाग नीस्तार* डेपोत बांबूची उपलब्धता
करून देण्याची मागणी करण्यात येत आहे परंतु बांबू उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य गोरगरीब जनतेला विविध प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे गुरुवारी दुपारी आयोजित भव्य जनता सेवा दरबारात हा विषय शहरातील विविध प्रभागातील जनतेने प्रामुख्याने उपस्थित केला आहे त्याची दखल येथील गुरुवारीय जनता दरबाराणे घेतला आहे व सदर समस्या गुरुवारी मुख्य वनसंरक्षक ,उप वन संरक्षक वन परिक्षेत्र अधिकारी, यांना कळवण्यात येईल त्यानंतर लगेच या बाबत सविस्तर आदरणीय वन मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना थेट भ्रमणध्वनी द्वारे कळवण्यात येईल असे नगरसेवक आशीष पिपरे , रमेश अधिकारी यांनी सांगितले .
0 Comments