जुन्या नालीच्या एक फुट उंचीवर नवीन नालीचे बांधकाम. नाली मधून पाणी जाईल कसे? नागरिकांनी बांधकाम थांबवीला.
कोरची.
कोरची येथील वार्ड क्रमांक 14 , दर्रोटोली येथे नालीचे बांधकाम सुरू आहे. या नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे. नालीच्या तळाशी बोल्डर ( 80/40 mm ) चा थर दिला नाही. 20 mm च्या गिट्टीचा फक्त 2 इंच थर देऊन तळ तयार करण्यात आले आहे. मजूरांना विचारले असता, सिमेंट, रेती गीठ्ठी सरासरी 1:4:4 असा प्रमाण वापरल्या जात असल्याचे सांगितले. छत्तीसगढ राज्यातून आणलेली निम्न दर्जाची गिट्टी वापरल्या जात आहे.रेतीमध्ये मातीचे प्रमाण जास्त आहे.त्यामुळे हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे.
कंत्राटदार हे भ्रष्टाचार निर्मूलन समिती चे जिल्हा अध्यक्ष असून, नागपूर वरुन प्रसारित होणाऱ्या हिन्दी दैनिक व मुंबई वरुन प्रसारित होणाऱ्या एका वृत्त वाहिनीचे पत्रकार आशिष अग्रवाल असल्याचे मजुरांनी व नगरपंचायतचे बांधकाम लिपिक जयपाल मोहुरले यांनी सांगितले. आणि नगरपंचायत चे सीओ सोनवणी यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद दिला नाही.त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही,
या नालीचे बांधकाम कोणत्या निधीतून आहे, किती रुपयाचे आहे, याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी नगरपंचायत चे कनिष्ठ अभियंता मंगेश नाकाडे यांना संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. बांधकाम विभागाचे काम पाहणारे जयपाल मोहुर्ले यांना विचारले असता,मला विचारल्याशिवाय कुणालाही कोणतीही माहिती द्यायची नाही असे अभियंता नाकाडे यांनी सांगितले त्यामुळे माहिती देता येणार नाही असे मोहुर्ले म्हणाले.
कनिष्ठ अभियंता मंगेश नाकाडे यांची आज दुपारी 2.00 च्या दरम्यान नगरपंचायत मध्ये सदर प्रतिनिधीने भेट घेऊन, सदर नाली किती मीटर आहे, नालीचे काम कोणत्या ठेकेदाराला दिले आहे, नालीचे अंदाजपत्रक दाखवा. पेट्रोल पंप जवळ जो अनावश्यक रस्त्याचे बांधकाम झाले, त्याची पण माहिती द्या.असे म्हटले असता, तुम्हाला नगरपंचायत मधील कोणतीही माहिती दिली जाणार नाही. माहिती पाहिजे असल्यास रितसर अर्ज करा. असे सांगितले. 14 जुलै ला माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागीतली, ती माहिती आजपर्यंत मिळाली नाही.
एकंदरीत बांधकामात जी अनियमितता आहे, त्यात अभियंता नाकाडे यांचेही ओले हात होत आहेत हे त्यांच्या बोलण्यावरून स्पष्ट दिसत होते.
*संबंधित अभियंत्याने मोक्यावर जाऊन कोणत्याही कामाचे ले आऊट द्यायला हवे.कमीत कमी भेट देऊन कामाची सुरुवात करणे अपेक्षित आहे.पण नगरपंचायतचे अभियंता हे फक्त बील तयार करण्यासाठी येतात आणि ओले हात करून जातात की काय? त्यांच्या वागण्याने दिसून आले. त्यामुळे नाकाडे यांच्या कडे जेव्हा पासून कोरची नगरपंचायचा प्रभार मिळाला, तेव्हा पासून झालेल्या संपूर्ण कामाची गुणनियंत्रण विभागाकडून विभागीय चौकशी करण्याची मागणी केली जात आहे*
गावकऱ्यांनी सध्या काम बंद केले असून जोपर्यंत इस्टिमेट नुसार काम होणार नाही तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही असे येथे जमलेल्या लोकांचे म्हणणे आहे.
यावेळी माजी उपसरपंच नंदकिशोर वैरागडे, निरिंगसाय मडावी, शालीकराम कराडे,वामन मोहुर्ले, राजू गुरनुले, अनिल उईके, क्रिष्णा पडोटी,धनराज मोहुर्ले, सांगसूरवार, महीला पुरुष मजूर उपस्थित होते.
0 Comments