शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प

शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प : माजी खा. अशोक नेते
 गडचिरोली: राज्य सरकारच्या विद्यमान कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सर्वांना खुश करणारा आहे. विशेषतः शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा आहे. माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांना दिड हजार रुपये महिना देऊन महिलांचा मोठा सन्मान केला आहे.

याशिवाय मुलींना व्यावसायिक शिक्षणात शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारा आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देणारा ठरणार आहे. एवढेच नाही तर मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेतून युवा वर्गात कौशल्य विकासाला चालना मिळून त्यांच्या रोजगार आणि स्वयंरोजगाराचा मार्ग अधिक प्रशस्त होईल. त्यामुळे अशा सर्वसमावेशक अर्थसंकल्पासाठी अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मी अभिनंदन करतो. अशोक नेते, मा. खासदार, गडचिरोली-चिमूर.


राज्याचा अर्थसंकल्प शेतकरी, सर्वसामान्य गरीब व महिलांना न्याय देणारा आ. डॉ. देवराव होळीलाडली बहन योजना, शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज माफी, मोफत सिलेंडर, यासारखे अनेक कल्याणकारी निर्णय घेतल्याने सरकारचे केले अभिनंदन
आजच्या अर्थसंकल्पातून राज्यातील मातृशक्तीला, शेतकऱ्यांना सर्वसामान्य गरिबांना विविध योजनांच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून हा खरोखरच सर्वसामान्य गरीब महिला शेतकऱ्यांना न्याय देणारा अर्थसंकल्प असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आ. डॉ. देवराव होळी यांनी अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारच्या आजच्या अर्थसंकल्पामध्ये २१ ते ६० वर्ष वयोगटातील महिलांना लाडली बहीण योजनेअंतर्गत १ हजार ५०० रुपये, शेतकऱ्यांना कृषी पंपांची थकीत बिल माफी सर्वसामान्य परिवाराला वर्षाला ३ मोफत सिलेंडर, मुलींना १००% मोफत शिक्षण, राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर, कापूस सोयाबीनला हेक्टरी ५ हजार रुपये मदत यासारखे जनतेच्या कल्याणकारी निर्णयाने हा अर्थसंकल्प वास्तविक शेतकरी, सर्वसामान्य गरीब व महिलांना न्याय देणारा ठरला असल्याचे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आ. डॉ. देवराव होळी यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments