गडचिरोली जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात पोरेड्डीवार गटाचे वर्चस्व






गडचिरोली,
गडचिरोली राजकीय व सहकार क्षेत्रात पोरेड्डीवार गटाचे नेहमीच वर्चस्व राहिलेले आहे. याचे कारण म्हणजे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात आरमोरी येथील पोरेड्डीवार परिवाराचे असलेले मोठे नेटवर्क व कार्यकर्त्याची मोठी मजबूत फळी हे आहे. त्यामुळे जिल्ह्याचे सहकार क्षेत्र हे पोरेड्डीवार परिवाराविना अधुरे आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निकालाने स्पष्ट झाले.
जिल्ह्यातील आरमोरी आणि गडचिरोली या दोन्ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पोरेड्डीवार गटाने प्रमुख विरोधी पक्षांना धूळ चारत सर्वच्या सर्व जागा जिंकून एकहाती सत्ता मिळविली. यावरून आरमोरी येथील पोरेड्डीवार गटाचे जिल्ह्यातील सहकार व राजकीय आहेत. क्षेत्रातील महत्त्व अधोरेखित झाले आहे.
आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील कॉंगेस, शिवसेना (ठाकरे) राष्ट्रवादी काँगेस हे तीन पक्ष पोरेड्डीवार गटाविरोधात एकवटले होते. त्यांनी जेवढी ताकद लावायची होती तेवढी ताकद लावली. मात्र, पोरेड्डीवार गटासमोर त्यांचा टिकाव लागला नाही. आरमोरी व गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पोरेड्डीवार गटाने सर्वच्या सर्व म्हणजे १८ पैकी १८ जागा जिंकून आणि सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समिती ७ उमेदवार भरघोस मतांनी निवडणूक आणले व आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.
आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची हे चार तालुके मिळून आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समिती बनलेली आहे. या चारही तालुक्यात पोरेड्डीवार गटाच्या हातात सेवा सहकरी संस्था
गेल्या ५५ वर्षापासून माजी आ. नामदेवराव पोरेड्डीवार यांच्या कार्यकाळापासून आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीवर पोरेड्डीवार गटाची एकहाती सत्ता राहिली आहे. ही सत्ता टिकवून ठेवण्याचे काम पोरेड्डीवार बंधूनी केले. याही निवडणुकीत त्यांनी आपल्या विरोधकांना जोराचा झटका दिला.
यापूर्वीही अनेकदा झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विरोधकांनी एकत्र येऊन मोठ्या ताकदीने निवडणुका लढल्या. मात्र, सत्ता खेचून आणण्यात विरोधकांना आजपर्यंत कधीच यश आले नाही. आताही त्यांना एकही जागा आपल्या पदरात पाडता आली नाही.
राज्याच्या सहकार क्षेत्रात अरविंद पोरेड्डीवार यांचे नाव आदराने घेतले जाते. गडचिरोली जिल्ह्याची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असो, की सेवा सहकारी संस्था असोत, की कृषी उत्पन्न बाजार समिती असो, या सर्व सहकारी संस्थावर पोरेड्डीवार गटाचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. सहकार क्षेत्रात पोरेड्डीवार गटाकडे कोरची ते सिरोंच्या ग्रामीण भागापर्यंत असलेले मोठे नेटवर्क, विश्वासू व कणखर कार्यकर्त्यांची मोठी फौज.
मैदान कोणतेही असो ते गाजवतातच
आहेत. शिवाय त्याचे विश्वासू कार्यकर्ते
आरमोरी विधानसभा क्षेत्रातील अनेक गावांत महविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या अनेक ग्रामपंचायती आहेत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत मतदारसंघ गटात काही जागा निवडून येतील, अशी आशा आघाडीतील तीनही पक्षांना होती. मात्र, त्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले. ग्रामपंचायत गटात पोरेड्डीवार गटाचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले. ज्येष्ठ सहकार नेते सहकार महर्षी अरविंद पोरेड्डीवार यांच्या मार्गदर्शनात त्यांचे लहान बंधू प्रकाश पोरेड्डीवार यांच्या नेतृत्वात अनेक निवडणुका लढवल्या जातात. पूर्ण ताकदीने निवडणुका लढून ते विजयश्री खेचून आणत आहेत.
जिल्ह्यात केवळ राजकीय, सहकार क्षेत्रातच नव्हे तर सामजिक, सांस्कृतिक क्षेत्रात पोरेड्डीवार परिवाराचे महत्त्वाचे स्थान राहिले आहे. मैदान कोणतेही असो, ज्या मैदानात ते उतरतात ते मैदान गाजवतात. हरण्यासाठी निवडणुका लढवीत नाही तर जिंकण्यासाठीच निवडणुका लढवितात. स्थानिक निवडणुका स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, नगर परिषद विधानसभा निवडणुकीत खाद्य उमेदवाराला पाण्याची व त्याला जिंकून आणण्याची असल्याची बाब आजपर्यंत झालेल्या अनेक निवडणुकीवरून प्रकर्षाने जाणवत आहे.
सहकार क्षेत्रात पोरेड्डीवार गटाची ताकद इतर गट व पक्षांना माहित असल्याने ते फारसा पंगा घेण्याची हिंमत ठेवत नसल्याचे दिसून येते.

Post a Comment

0 Comments