प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मुदत ३ आगस्ट पर्यंत वाढली :अन्याय अत्याचार भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार

अखेर प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मुदत ३ आगस्ट पर्यंत वाढली :अन्याय अत्याचार भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांची शासनाचे मानले आभार..


गडचिरोली,
प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ३१ जुलै २०२३ पर्यंत मुदत होती..जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिकविमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते . केवळ एक रुपयात पिक विमा निघत असल्यामुळे त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा होईल असा शासनाचा हेतू आहे आणि सदर हेतू उत्तम आहे..
गडचिरोली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी नेटवर्कची समस्या आहे शिवाय पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक लोकांना सुविधा केंद्र पर्यंत जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे प्रधानमंत्री पीक विम्याची मुदत ही पुन्हा एक महिना वाढवून देण्यात यावी अशी मागणी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी प्रशासनाला विनंती केली होती.. राज्याच्या विविध भागातूनही तशी मागणी प्रशासनाला केली केली होती त्यामुळे सदर मागणीची दखल घेऊन आज तीन ऑगस्टपर्यंत पिक विम्याची मुदत वाढली आहे. सदर निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी प्रशासनाचे आभार मानले आहे.

Post a Comment

0 Comments