गुरु हा सर्वांना सुशिक्षित व सुसंस्कारित करीत असतो - आमदार, कृष्णा गजबे यांचे प्रतिपादन

गुरु हा सर्वांना सुशिक्षित व सुसंस्कारित करीत असतो -
आमदार, कृष्णा गजबे यांचे प्रतिपादन

शिक्षादानाचे कौशल्य वाढवण्यासाठी पंचायत समिती कुरखेडा यांचा पुढाकार, शिक्षकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

 

कुरखेडा:-
 शिक्षक हा गुरु असून गुरुजी हा सर्वांना सुशिक्षित व सुसंस्कारित करीत असतो. शिक्षकांना अध्यापनाचे काम अधिक प्रभावीपणे करता यावे हा या शिबिरामागचा उद्देश असून शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबतचे ऋणानुबंध अधिक घट्ट करण्यासाठी काय प्रयत्न करावे आणि शिक्षण अधिक प्रभावीपणे कसे देता येईल याबाबतची नवी कौशल्ये आत्मसात करण्यासाठी पंचायत समिती कुरखेडा यांच्या वतीने "शिक्षकांसाठी मार्गदर्शन शिबिरा"चे आयोजन आज दिनांक १४ जुन २०२४ रोजी कुरखेडा येथील संस्कार पब्लिक स्कूल सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते. या मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिराबाबत बोलताना आमदार कृष्णा गजबे म्हणाल्या की, या शिबाराचे उद्देश हे वेगाने बदलणाऱ्या शिक्षण पद्धतीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना शिक्षणदानाचे काम अधिक प्रभावीपणे करण्यासाठी नवी कौशल्ये शिकवणे हा असून शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा उद्देश हा शिकवण्यापेक्षा शिकण्यावर भर देणे हा आहे. शिक्षण असे असावे ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्न पडले पाहिजेत, जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे त्यांना शिकवलेल्या गोष्टीं डोळ्यासमोर उभ्या राहिल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांना त्यांच्यातील खरी क्षमता ओळखण्यास मदत व्हावी यासाठी अशा शिबिराचे आयोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. शिकवण्याचा दर्जा उंचावत असताना शिकण्याची गुणवत्ताही सुधारणे गरजेचे असते. शिक्षण हे मुळात विद्यार्थ्यांना ज्या गोष्टी शिकवल्या जातात त्याबद्दल उत्सुकता निर्माण करण्यासाठी असते. असे प्रतिपादन यावेळी आमदार कृष्णा गजबे यांनी यावेळी केले.
 यावेळी शिबिराचे उद्घाटक आमदार कृष्णा गजबे, शिबिराच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती कुरखेडाचे गटविकास अधिकारी धीरज पाटील, विशेष अतिथी म्हणून पंचायत समिती कुरखेडा चे गटशिक्षणाधिकारी रवींद्र शिवणकर, संस्था कोषाध्यक्ष तथा शाळा समिती अध्यक्ष वामनराव फाये, सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष खुशाल फुलबांधे, पंचायत समिती कुरखेडाचे शिक्षण विस्तार अधिकारी अनिल मुलकलवार, बालाजी बावणे, प्राचार्य एल. डब्लू बडवाईक, विजय बनसोड, नामदेव सहारे हे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments