हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे "आपला दवाखाना" चे उद्घाटन आमदार कृष्णा गजबे यांचे हस्ते संपन्न

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे "आपला दवाखाना" चे उद्घाटन आमदार कृष्णा गजबे यांचे हस्ते संपन्न


 
गडचिरोली,
     आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत देसाईगंज व आरमोरी शहरात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे "आपला दवाखाना" या दोन आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन आमदार कृष्णा गजबे यांचे हस्ते करण्यात आले. या दवाखान्याच्या माध्यमातून मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्यसुविधा सहज-सुलभ व जलदगतीने मिळण्यास नक्कीच मदत होईल सर्वांनी या दवाखाण्याचा लाभ घेण्याचे आवाहन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांनी केले.
  हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब  ठाकरे "आपला दवाखाना" अंतर्गत खालीलप्रमाणे आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येतील...बाह्यरुग्ण सेवा, मोफत औषधोपचार, मोफत तपासणी, टेलिकन्सल्टेशन, गर्भवती मातांची तपासणी लसिकरण, महीण्यातील निश्चित दिवशी नेत्र तपासणी, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, बाहययंत्रणेव्दारे रक्त तपासणीची सोय, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, याकरीता वैद्यकिय अधिकारी, अधिपरिचारीका, बहुदेशिय आरोग्य कर्मचारी,अटेन्डन गाई व सफाई कर्मचारी याप्रकारे मनुष्यबळ कार्यरत राहील.
     यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे, मोतीलालजी कुकरेजा माजी भाजपा जिल्हाउपाध्यक्ष तथा मा. उपाध्यक्ष नगर परिषद वडसा, डॉ. अभिषेक कुमारे तालुका आरोग्य अधिकारी वडसा, डॉ. अशोक गहाने वैद्यकीय अधिकारी सावंगी, डॉ. नेताजी बनसोड वैद्यकीय अधिकारी विहिरगाव, वडसा व आरमोरी तालुक्यातील सर्व आरोग्य कर्मचारी वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी तसेच ग्रामस्थही उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments