पोलीस स्टेशन बल्लारपूर हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाई मधील दारु ही बनावट असल्याचे निष्पन्न

पोलीस स्टेशन बल्लारपूर हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाई मधील दारु ही बनावट असल्याचे निष्पन्न

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा रासायनिक विश्लेषण अहवाल प्राप्त


चंद्रपूर,
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर चे पथक पोलीस स्टेशन बल्लारपूर हद्दीत अवैध धंदे विरुध्द कारवाईची पेट्रोलींग करीत असतांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन कळमना गावाजवळ नाकाबंदी करुन एक महिन्द्रा स्कॉपिओ वाहन क. MH34-CJ-6576 ला थांबवून पंचासमक्ष सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात अवैध रित्या देशी विदेशी दारु साठा मिळुन आला. तसेच सदर गुन्हयात पायलटींग करीता वापरलेला वाहन टाटा अल्ट्रोझ क्र. MH34-CJ-7337 चा चालक सदर वाहन सोडुन पळुन गेला. यावरुन सदर प्रकरणी पो.स्टे. बल्लारपूर येथे अपराध क्रमांक ४६२/२०२५ कलम ६५ (अ), ८५ महाराष्ट्र दारुबंदी कायदान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सदर गुन्हयात आरोपी नामे नितीन राजन कुंडे वय ३५ वर्ष रा. राजेंद्रप्रसाद वार्ड बल्लारपूर यास अटक करुन त्याचे ताब्यातील वाहनामधील अवैध दारु साठा (१) देशी दारु रॉकेट संत्रा 90 ml च्या ३८०० नग निपा किं. १,३३,०००/- रु. (२) बिअर haywards 5000 500 ml च्या ७२ टिन किं. ९३६०/- रु. (३) विदेशी दारु Imperial Blue 180ml च्या ४८ नग निपा किं. ८१६०/- रु. (४) महिन्द्रा स्कॉपिओ वाहन क्र. MH34-CJ-6576 किं. १५,००,०००/- रु. (५) टाटा अल्ट्रोझ क्र. MH34-CJ-7337 किं.७,००,०००/- रु. असा एकुण २३,५०,५२०/-रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
सदर गुन्हयातील जप्त दारु साठा मधील नमुन्याची पडताळणी करणे बाबत राज्य गुन्हे उत्पादन शुल्क विभागास पत्र दिल्याने त्यांनी सदर जप्त दारु साठी मधील नमुन्याची रासायनिक विश्लेषण करून सदरची दारु ही बनावट असल्याबाबत अहवाल दिलेला आहे
यावरून सदर गुन्हयात बनावट दारु संबंधाने कलम १२३, ३१८(४), ३३६(२), ३३६(३), ३४०(२), ४९ भारतीय न्याय संहिता-२०२३ चे वाढ करण्यात आले असुन पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments