आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 75 वा वाढदिवस गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस तर्फे "राष्ट्रीय बेरोजगार दिवस" पकोडा बेचो अदोलन म्हणून साजरा करण्यात आला - भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव एड. विश्वजीत मारोतराव कोवासे
गडचिरोली,
देशात सध्या लाखो सुशिक्षित तरुण-तरुणी बेरोजगार आहेत. B.A., B.Com., M.A., LLB, इंजिनिअरिंग, MBA यांसारख्या उच्च शिक्षण घेतलेल्या युवकांनाही रोजगार मिळत नाही, ही अतिशय गंभीर व चिंताजनक बाब आहे.
2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देशवासीयांना दिले होते. मात्र, गेल्या 11 वर्षांत हे आश्वासन प्रत्यक्षात उतरताना कुठेही दिसलेले नाही. उलटपक्षी, केंद्र सरकारने सुरू केलेल्या खासगीकरणाच्या धोरणांमुळे, शासकीय व निमशासकीय नोकर्या कमी होत असून, सामान्य तरुणांसाठी संधी आणखीनच लांब गेल्या आहेत. म्हणून गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेस तर्फेपकोडे बेचो आंदोलन करण्यात आले
आजचा दिवस केवळ निषेधाचा नव्हे, तर सरकारला जाब विचारण्याचा आहे.
बेरोजगार तरुणांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कुणीही करू नये असा स्पष्ट इशारा भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव एड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी दिला आहे.
यावेळी भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे, गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड,गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत,चामोर्शी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष प्रेमानंद गोंगले, शहराध्यक्ष विवेक घोंगडे, कुरखेडा तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष प्रांजल धाबेकर, गडचिरोली तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष स्वप्निल बेहरे, अनिकेत राऊत श्रीनिवास ताडपलीवार, कमलेश खोब्रागडे अभिजीत धाइत, विलास चीचघरे, प्रफुल आंबोरकर, आशिष वाढई, निलेश भोयर, मिथुन गेडाम, तनु वडेट्टीवार, निलेश भोयर, प्रांजल रामटेके, विवेक गेडाम, अंकुश बावणे, सुमित मेश्राम, क्रिश सांगिडवार मिलिंद बारासागडे, संतोष करपे, गडचिरोली महिला तालुकाध्यक्ष कल्पना नंदेश्वर, रिता गोवर्धन, सुनीता रायपुरे, आशा मेश्राम, माधुरी हजारे, कविता हजारे, , युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष हेमंत कोवासे, जावेद खान, राहुल वैरागडे, आशिष घेर, राजू लांबाडे, करण शेंडे, तेजस कोंडेकर, विजय राऊत, पंकज राऊत, होमा ननावरे, पुरुषोत्तम पद्मगिरीवार, लोकेश पोटावी, अप्रव भैसारे, विनोद कुमरे व मोठ्या संख्येने युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments