भरड धान्यापासून विविध पौष्टिक आहार बनविणाऱ्या महिलांचा सत्कार - माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे

भरड धान्यापासून विविध पौष्टिक आहार बनविणाऱ्या महिलांचा सत्कार - माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे


गडचिरोली : - 

    2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे भरड धान्य वर्षाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा गडचिरोली च्या पदाधिकाऱ्यांनी गडचिरोली शहरातील भरड धान्य ( ज्वारी, बाजरी )पासून पौष्टिक पदार्थ बनविणाऱ्या छोट्या छोट्या भोजनालयांची व पोळी भाजी केंद्र यांची भेट घेतली व  महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते  ज्वारीच्या भाकरी  व झुणका बनविणाऱ्या महिला व  छोट्या व्यावसायिकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी झुणका भाकरीचा आस्वाद घेतला. यावेळी महिला मोर्चा च्या  जिल्हा सचिव प्रतिभा चौधरी, शहर अध्यक्ष कविता उरकुडे, शहर महामंत्री वैष्णवी नैताम, शहर महामंत्री रश्मीताई बाणमारे, माजी नगरसेविका लता लाटकर, शहर उपाध्यक्ष कोमल बारसागडे, शहर सचिव नीताताई बैस, शहर उपाध्यक्ष ज्योतीताई बागडे, पुनम हेमके,  वंदना शिंपी, सुनीता गेडाम, धकाते काकू उपस्थित होत्या.
    2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर भरड धान्य वर्ष म्हणून साजरा करण्यात येत आहे. भारतीय संस्कृतीत आरोग्याच्या दृष्टीने भरडधान्य ( mailed food ) अर्थात श्रीअन्न अत्यंत महत्त्वाचे आहे . याचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्राने हा उपक्रम सुरू केलेला असून सदर उपक्रम 5 जुलै ते 25 जुलै 2023 पर्यन्त राबविण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments