चित्रकलेतून विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुणांना चालना द्यावी.-
माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांचे प्रतिपादन
गडचिरोली :
विद्यार्थ्यांमध्ये काही न काही कलागुण उपजतच असतात . या कलेला प्रोत्साहन व संधी देण्याची गरज असते व ती संधी सकाळ वृत्तपत्राने उपलब्ध करून दिली आहे ही कौतुकास्पद बाब आहे. या चित्रकला स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील कल्पना व कृती कागदावर उमटवीत आहेत ही खरोखरच अभिनंदनिय बाब आहे. विद्यार्थ्यांनी या चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यातील कलागुणांना चालना द्यावी व पुढील काळात यशस्वी व्हावे व आपली शैक्षणिक प्रगती साधावी असे प्रतिपादन गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी केले सकाळ वृत्तपत्र समूहाच्या वतीने विद्याभारती कन्या हायस्कूल गडचिरोली येथे आयोजित चित्रकला स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विद्याभारती कन्या हायस्कूलच्या प्राचार्या वंदना मुनघाटे , सकाळ वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी मिलिंदजी उमरे सकाळचे प्रतिनिधी पुष्पक भांडेकर, सहायक शिक्षक गद्देवार सर व शिक्षक वृंद उपस्थित होते. यावेळी प्राचार्या वंदना मुनघाटे यांनीही विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले.
सकाळ वृत्तपत्र समूहाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात दरवर्षीच अशा चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले जाते व जिल्हा स्तरावर विजयी स्पर्धकांना विदर्भ स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते तसेच या स्पर्धेत विजयी स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येते. या चित्रकला स्पर्धेत माध्यमिक व हायस्कुल च्या विद्याथीनिनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
0 Comments