चामोर्शी तालुक्यातील देवळी ( नाचनगाव ) गावास नगर पंचायत चामोर्शीत सहभागी करा,देवळी वासीय जनतेची एकमुखी मागणी नगरसेवक आशीष भाऊ पिपरे यांनी घेतली दखल

चामोर्शी तालुक्यातील देवळी ( नाचनगाव ) गावास नगर पंचायत चामोर्शीत सहभागी करा,देवळी वासीय जनतेची एकमुखी मागणी
नगरसेवक आशीष भाऊ पिपरे यांनी घेतली दखल


दिनांक
चामोर्शी तालुक्यांतील गडचिरोली रोडवर शहरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या देवळी येथील नागरिकांनी नगरसेवक आशीष भाऊ पिपरे यांनी सुरू केलेल्या जनता सेवा दरबार उपक्रमास भेट देऊन आपली समस्या कळवली *व आपल्या गावातील विविध समस्या बाबत सांगीतले व गेल्या अनेक वर्षांपासून गावात साधे रस्ते नाली बांधकाम होऊ शकले नाही तसेच गाव आजही अनेक सोई सुविधा पासून वंचित आहे*
नागरिकांना निधी अभावी विविध संकटाना सामोरे जावे लागत आहे परंतु गावाचा कुणी वाली नाही अशी अवस्था झाली आहे,देवळी गाव येथील गट ग्रापंचायात अंतर्गत येत असल्याने निधी अभावी पाहिजे तितका विकास शक्य नाही व गडचिरोली मुख्य रोडवर देवळी गाव वसलेले आहे
परंतु आजही गाव विकासापासून कोसो दूर आहे ,अनेक लोकप्रतिनिधी निवडून दिल्यानंतर त्यांनी फक्त आश्वासनं दिली परंतु गावाच्या विकासा बाबत कोणतेच पाऊल उचलले नाही व आज गावाची विकासा बाबत दयनीय अवस्था झाली आहे, तसेच चामोर्षी नगर पंचायत अंतर्गत एकूण सतरा प्रभाग आहेत त्यापैकी दहेगाव
हेटी, सावरहेटी एक किमी अंतरावर असूनही नगर पंचायत प्रक्षेत्रात सहभागी करण्यात आले आहे त्याच प्रमाणे देवळी हे गाव चामोर्शी शहरापासून फक्त एक किलोमीटर अंतरावर वसलेला आहे त्यामुळे देवळी येथील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी नगर पंचायत चामोर्शी अंतर्गत देवळी गावाला सहभागी करण्यात यावे अशी मागणी देवळी येथील नागरिकांनी
जनता सेवा दरबार येथे केली होती या मागणीची दखल घेऊन नगरसेवक आशीष भाऊ पिपरे यांनी आज गावात बैठक घेऊन समस्या जाणून घेतले व उपस्थितांना मार्गदर्शन केले व या विषयावर गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक भाऊ नेते यांचे मार्गदर्शनात जिल्हाधिकारी गडचिरोली  यांच्यासोबत चर्चा करून ही मागणी पूर्ण करण्यासाठी आपण मंत्रालयात पाठपुरावा करू असे आश्वासन दिले यावेळी प्रामुख्याने भाजपा सोशल मीडिया प्रमुख रमेश अधिकारी
भाजपा सहकार आघाडी नेते तुळशीराम पाटील नताम उपस्थित होते व देवळी गावातील युवा व स्थानिक नागरिक उपस्थित होते

Post a Comment

0 Comments