मौशीखांब - मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राचा ‘गड’ जिंकण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे..!



मौशीखांब - मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्राचा ‘गड’ जिंकण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे..!

शिवसैनिकांच्या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा प्रमुख शिवाजीराव झोरे यांचे प्रतिपादन.

जिल्हा सहसपंर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिक एकवटले..!



गडचिरोली ,
तालुक्यातील मौशीखांब - मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, गटप्रमुख, शाखाप्रमुख, बुथप्रमुख व शिवसैनिकांची बैठक शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शनिवार, दिनांक ५ ऑगस्ट २०२३ रोजी अमिर्झा येथे आयोजित करण्यात आली होती. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला गडचिरोली विधानसभा प्रमुख शिवाजी झोरे, शिवेसना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी ‘‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’’, ‘‘जय भवानी - जय शिवाजी’’, मा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो..’’ मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’’ ‘‘मा. आदित्य साहेब ठाकरे यांचा विजय असो’’, ‘‘शिवसेना जिंदाबाद !’’ ‘‘आवाज कुणाचा... शिवसेनेचा..’’ अशा गगनभेदी घोषणांनी अमिर्झा परिसर शिवसैनिकांनी दणाणून सोडला. यावेळी शिवसैनिकांना संबोधीत करतांना शिवसेना (उबाटा) पक्षाचे गडचिरोली विधानसभा प्रमुख शिवाजीराव झोरे म्हणाले  आपल्या क्षेत्राचा विकास करायचा असेल तर नेतृत्व दमदार असले पाहिजे. गावपातळीवर जाऊन जनतेमध्ये मिसळून गावातील समस्या प्रशासन दरबारी लावून धरल्याशिवाय समस्या सुटत नाही. उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क  प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी मागील दोन वर्षापासून मौशीखांब - मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी कठोर मेहनत घेतली.  या क्षेत्रात कात्रटवार यांचा तगडा जनसंपर्क आहे. आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी या क्षेत्रातील समस्या सोडविण्यास प्रशासनास भाग पाडले. या क्षेत्रात वर्षभर विविध उपक्रम राबवून आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. दमदार नेतृत्वाचे धनी असलेले अरविंदभाऊ  कात्रटवार यांच्या नेतृत्वात आगामी जिल्हा परिषद निवडणूकीत मौशीखांब - मुरमाडी क्षेत्राचा गड जिंकण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे, असे प्रतिपादन उबाठाचे विधानसभा प्रमुख शिवाजीराव झोरे यांनी केले.
कार्यकर्त्यांना संबोधीत करतांना विधानसभा प्रमुख शिवाजीराव झोरे पुढे म्हणाले, शिवसैनिक हेच आपल्या पक्षाची खरी ताकद आहेत. शिवसैनिकांनी तळागातील जनतेपर्यंत जाऊन उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ध्येयधोरण पटवून दिले पाहिजे. एवढेच नव्हे तर जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी तत्पर असले पाहिजे. जिल्हा परिषद निवडणूकीत मौशीखांब - मुरमाडी क्षेत्रात आपल्या पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे योगदान द्यावे आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद वाढवावी, असे आवाहनही शिवाजीराव झोरे यांनी केले.
यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले, मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रत्येक गावांचा विकास झाला पाहिजे यासाठी आपली धडपड सुरू आहे. या क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूरांच्या समस्या तसेच रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण आदी समस्या सोडविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशिल आहे. या क्षेत्रातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव पुढाकार घेतला. प्रशासनाकडे पाठपुरावा करून तसेच वेळप्रसंगी आंदोलन उभारून जनतेच्या न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. जनतेला न्याय मिळवून दिल्यानंतर मिळणारा आंनद हा आपण केलेल्या कार्याची पावतीच असते.  या क्षेत्रातील शिवसैनिक आणि जनतेचे माझ्या सत्कार्यात हातभार लागत असल्याने मला काम करण्याचे बळ मिळत आहे.  शिवसैनिकांनी विजयाचा निर्धार करून आगामी जिल्हा परिषद निवडणूकीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी तत्पर राहावे असे प्रतिपादन अरविंदभाऊ  कात्रटवार यांनी केले.
याप्रसंगी सहसंपर्क प्रमुख विलास कोडाप, राजेंद्र लांजेकर, उपजिल्हा प्रमुख सुनिल पोरेड्डीवार,  यादवजी लोहंबरे, संजय बोबाटे, नवनाथ उके, प्रशांत ठाकुर, संदिप आलबनकर, सुरज उईके, दिपक लाडे, अमित बानबले, संदिप भुरसे, विलास दासगाये, गोपाल मोगरकर, विलास वासेकर, स्वप्निल धोडरे, चंद्रभान नैताम,  तुषार बोरकर, खुशाल आवारी, सचिन भरणे, विजय भरणे, उमाकांत हर्षे, कैलाश फुलझेले, गौरव हर्षे, हरिदास हर्षे,  हरबाजी दासगाये, तानबा दासगाये, रामदास बह्याल, निकेश लोहंबरे, प्रविण निसार, नेपाल लोहंबरे, मिथुन चापडे, जीवन कुरटकार, यादव चौधरी, शिवम लोहंबरे, जीवन कुकडकार, दिलीप चनेकार, अंबादास मुनघाटे, दिलीप वलादी, निकेश मडावी, विनोद मुत्यमवार, स्वप्निल मोदेकर, रमेश चौधरी, मोहन सोरते, हिवराज वाकडे, रविंद्र सावसाकडे, प्रेमदास जांभुळकर, बालाजी बाबनवाडे, अनिल दोडके, प्रकाश नागपूरे, निलकंठ रणदिवे, बापू भादे, पांडूरंग धानफोले, सुरेश मसराम, मंगेश कांबडी, सुधाकर सावसागडे, राजु जवादे, अरुण बारापात्रे, संजय मेश्राम, दशरथ चापडे, रत्नाकर रंधये, उमाजी चनेकार, वसंत आभारे, रमेश सिडाम, मयुर भोयर, महेश लाजुरकर, अंकुश झाडे, पंकज चनेकार, खुशाल मेश्राम, प्रांजल कोलते, पराग कुमरे, पुरुषोत्तम चनेकार, दुर्वेश मुनघाटे, सुभाष देशमुख, भाऊराव मुनघाटे, गुरुदेव गोहणे, कुणाल पेंदाम, अमर निंबोड, अनंत हुलके, राहुल मडावी, भक्तदास खेवले, सुरज टेकाम, गुरुदेव सेलोटे, कवळूजी धंदरे, गणेश खेवले, सचिन भरणे यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments