हाताने विविध वस्तू बनविणाऱ्या अडपल्ली व साखरा येथील ग्रामीण महिलांचा सत्कार
जागतिक नॅशनल हँडयुलम सप्ताहानिमित्य भाजप महिला मोर्चाचा ग्रामीण भागात उपक्रम
साखरा येथे भाजपचे घर -घर चलो महा जनसंपर्क अभियान
गडचिरोली :-
जागतिक नॅशनल हँड्युलम सप्ताहा निमित्य भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने दि 8 आगस्ट रोजी गडचिरोली तालुक्यातील ग्रामीण भागातील अडपल्ली व साखरा येथील हाताने विविध वस्तू बनविणाऱ्या महिलांचा सत्कार करून जागतिक हँड्युलम सप्ताह साजरा करण्यात आला. याप्रसंगी महिला मोर्चा च्या जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते गेल्या 40 वर्षापासून बांबूपासून हस्तकलेद्वारा टोपली, डाले व अन्य विविध वस्तू तयार करणाऱ्या अडपल्ली येथील अर्चना अशोक चिलगलवार तसेच मोहाच्या व पळसाच्या पानापासून पत्राळी बनविणाऱ्या साखरा येथील विजयाबाई तुळशीराम चापडे व चंद्रशेखर चापडे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी महिला मोर्चा च्या जिल्हा सचिव प्रतिभा चौधरी, तालुका अध्यक्ष अर्चना बोरकुटे, गडचिरोली च्या शहर अध्यक्ष कविता उरकुडे, पुष्पा करकाडे, मंदा मांडवगडे, शोभा फाये, पुनम हेमके उपस्थित होत्या.
जागतिक नॅशनल हँड्युलम दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने भारताचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात महिला मोर्चा च्या प्रदेश अध्यक्ष मा. चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रभर जागतिक नॅशनल हँडयुलम सप्ताह दिनांक ४ ऑगस्ट ते 10 ऑगस्ट २०२३ पर्यंत साजरा करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने महिला मोर्चाच्या जिल्हा प्रभारी योगिताताई पिपरे यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यात हॅण्डलूम सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
तसेच गडचिरोली तालुक्यातील साखरा येथे मोदी @ 9 घरघर चलो महा जनसंपर्क अभियान राबवण्यात आले यावेळी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा प्रभारी योगीताताई पिपरे यांच्या नेतृत्वात साखरा येथील घराघरांमध्ये जाऊन नागरिकांना शासनाच्या योजनेची पत्रके वाटण्यात आली व नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व मोदी सरकारने गेल्या 9 वर्षात केलेल्या कार्याची माहिती देण्यात आली.
0 Comments