उपमुख्यमंत्रिद्वय फडणवीस, पवार उद्या गडचिरोलीत अहेरी येथे सुरजागड इस्पात प्रायव्हेट लि. स्टील प्रकल्पाची पायाभरणी

उपमुख्यमंत्रिद्वय फडणवीस, पवार उद्या गडचिरोलीत अहेरी येथे सुरजागड इस्पात प्रायव्हेट लि. स्टील प्रकल्पाची पायाभरणी


गडचिरोली, 
 जिल्ह्यातील अहेरी विभागातील वडलापेठ येथे उद्या, १७ जुलै रोजी बुधवारी सुरुागड इस्पात कंपनीच्या स्टील प्रकल्पाचे भूमिपूजन होणार असून यासाठी उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे गडचिरोलीत घेत आहेत. विदर्भातील औद्योगिक विकासाच्या दिशेने महत्वपूर्ण
वाटचाल करताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या, १७ जुलै रोजी सुरजागड इस्पात प्रायव्हेट तिमिटेड स्टील प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. हा महत्त्वाकांक्षी उपक्रम १० हजार कोटींचा असून
या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या ७,००० पेक्षा स्थानिकांना
रोजगार निर्माण करणे अपेक्षित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेनुसार आणि महाराष्ट्रात गुंतवणूक आणि औद्योगिक
विकासाला चालना देण्यासाठी. गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त अहेरी तालुक्यातील वडतापेठ येथे एकात्मिक स्टील प्लॉटची स्थापना
करून विकासाच्या दृष्टिकोनात योगदान देत या स्टील प्लॉटची निर्मिती एकूण ३५० एकर क्षेत्रात होणार आहे. या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्री उदय सामंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम व अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment

0 Comments