आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत काम करण्याचं मला भाग्य लाभलं – मा.खा. डॉ. अशोकजी नेते

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत काम करण्याचं मला भाग्य लाभलं – मा.खा. डॉ. अशोकजी नेते

संकल्प ते सिद्धी” कार्यक्रमास सिरोंच्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
   यासोबतच एक पेड़ माँ के नाम अंतर्गत वृक्षारोपण संपन्न.



सिरोंचा 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या ११ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी, तालुका सिरोंचा तर्फे “संकल्प ते सिद्धी” या विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन आज सिरोंचा येथील शासकीय विश्रामगृहात अत्यंत उत्साहात पार पडले.यासोबतच एक पेड़ माँ के नाम या कार्यक्रमा अंतर्गत मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आणि प्रमुख मार्गदर्शन माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री  डॉ. अशोकजी नेते यांनी भूषवले. कार्यक्रमास भाजपाचे अनेक जेष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यामध्ये ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जेष्ठ नेते सत्यनारायण मंचरर्लावार, जिल्हा उपाध्यक्ष दामोदर एरिगेला, तालुकाध्यक्ष श्रीनाथ राऊत, जिल्हा सचिव संदीप राचर्लावार, माजी उपसभापती रहिमभाई, शारिकभाई शेख, लियाकतभाई, कृ.उ.बा.स. सभापती सतीश गंजीवार, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रमणा कडालावार, माधव कासर्लावार, तसेच महिला व युवा मोर्च्याचे पदाधिकारी, मंडळ संयोजक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मोदींच्या नेतृत्वाने देशाला नवचैतन्य दिलं" .खा. डॉ. अशोकजी नेते यांचे प्रेरणादायी प्रतिपादन
मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकताना सांगितले  “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश सेवा, सुशासन व गरीब कल्याण या त्रिसूत्रीच्या आधारे एका नव्या उंचीवर पोहोचला आहे. 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास' या मंत्रातून देशात नवचैतन्य निर्माण झाले आहे. केंद्र सरकारने योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवला  हाच खरा लोककल्याणकारी राजकारणाचा आदर्श आहे.    मी लोकसभेत असताना सलग दहा वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करण्याची संधी लाभली. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीला मी जवळून अनुभवले आहे. त्यांच्या कारकिर्दीत संसदेमध्ये कार्य करण्याचं भाग्य मला लाभलं, हे माझं मोठं भाग्य आहे.

 सिरोंच्यातील विकासाचं वास्तव चित्र
स्थानिक प्रश्नांना हात घालत मा.खा. नेते म्हणाले  प्राणहीता व गोदावरी नद्यांवर पूर्वी पूल नव्हते, त्यामुळे जनतेला नाव्हाचा आधार घ्यावा लागे. अनेक अपघात आणि जीवितहानीच्या घटनाही घडल्या. मात्र आज या दोन्ही नद्यांवर भक्कम पूल उभे राहिले आहेत  हेच खरे विकासाचे प्रत्यक्ष उदाहरण आहे.  काँग्रेसने ६० वर्षांत न केलेली कामे केवळ ११ वर्षांत मोदी सरकारने पूर्णत्वास नेली. कलम ३७० हटवणे, तीन तलाक बंदी, सर्जिकल स्ट्राईक, 'ऑपरेशन सिंदूर', अयोध्येतील राम मंदिर उभारणीचा ऐतिहासिक निर्णय, कोरोनासारख्या संकटात देशाला सुरक्षित ठेवणे – ही सर्व कामगिरी मजबूत नेतृत्वामुळे शक्य झाली,” असे ते म्हणाले.    पुढे बोलतांना  भारताची अर्थव्यवस्था जी पूर्वी डळमळीत होती, ती आज जागतिक क्रमवारीत चौथा व्या स्थानी पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा भक्कम करणं हेही मोदी सरकारचं मोठं योगदान आहे.
दहा वर्षांच्या लोकप्रतिनिधी कालखंडातील ठळक कामगिरी  माझ्या खासदारकीच्या दहा वर्षांत अनेक विकासकामे मार्गी लावली. यात रेल्वे प्रकल्प, मेडिकल कॉलेज, गोंडवाना विद्यापीठ, कृषी महाविद्यालय, चिचडोह व कोटगल बॅरेजेस, एकलव्य विद्यालय, एअरपोर्ट आणि राष्ट्रीय महामार्गांची कामे या सर्वांचा समावेश होतो, असे डॉ. नेते यांनी सांगितले.
  या “संकल्प ते सिद्धी” कार्यक्रमाद्वारे केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवली गेली. आगामी काळात जनजागृती मोहिमा, संघटनात्मक बळकटी, आणि कार्यपद्धती यांचा विस्तार करण्यासाठीही या कार्यक्रमात दिशा देण्यात महत्वाचे ठरेल यासाठी बाबुराव कोहळे, रविंद्र ओल्लालवार, प्रकाश गेडाम यांच्यासह या वक्त्यांनी पुढे बोलताना, प्रत्येक गावात मोदी सरकारची कामगिरी पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला. “संकल्प ते सिद्धी केवळ एक कार्यक्रम नाही, तर कार्यकर्त्यांच्या कृतीला दिशा देणारा प्रेरणास्त्रोत आहे,” असा विश्वास सर्व उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments