रस्त्यात अडवुन ऑनलाईन जबरी चोरी करणाऱ्यांना २४ तासात अटक.

रस्त्यात अडवुन ऑनलाईन जबरी चोरी करणाऱ्यांना
२४ तासात अटक.

दोन लाख आठ हजार तीन शे रुपयाची मालमत्ता जप्त पोलीस ठाणे पडोली ची कारवाई


चंद्रपूर,
दिनांक १६ जुन, २०२५ रात्रौ ००:४५ वाजता सुमारास यातील फिर्यादी नामे उमेश महंत साह वय ५० वर्ष रा. भद्रावती हे आपल्या मोटार सायकलवरुन राज्य महामार्गावरुन भद्रावती जात असतांना मौजा साखरवाही फाटयाजवळ फिर्यादीचे मोटार सायकलला मागेहून येणाऱ्या मोटार सायकलवरील ४ अनोळखी इसमांनी अडवुन फिर्यादीचा मोबाईल जबरीने हिसकावून घेवुन त्या मोबाईल मधुन ९१ हजार रुपये अज्ञात इसमाच्या नावाने ट्रॉन्सफर केले. फिर्यादीचे रिपोर्ट वरून पो.स्टे. पडोली येथे अपराध क्रमांक ७३/२०२५ कलम ३०९ (४) ३ (५) भारतीय न्याय संहिता अन्वये जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

हाय-वे वरील जबरीचोरीच्या गुन्हयाचे गांभीर्य पाहता पडोली पोलीसांनी अज्ञात मोटार सायकलस्वार गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी गोपनिय बातमीदार व तांत्रिक दृष्टया तपास करून २४ तासात सदर गुन्हा दोन विधी संघर्ष बालकासह आरोपी नामे (१) रुषीकेश आंबोलकर (२) अनुज महाजन यांनी केल्याचे निष्पन्न झाले आहे. वरील नमुद दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. आरोपीकडुन रोख ४४ हजार रु., एक होंडा शाईन मोटार सायकल किं. १,००,०००/- रु., चोरलेल्या पैशातुन खरेदी केलेले कपडे किं. १३,३००/- रु. आणि एकुण ४ नग मोबाईल कि. ३१,०००/- रु. असा एकुण २,०८,३००/- रुपयाची मालमत्ता जप्त करण्यात आली असुन पुढील तपास पडोली पोलीस करीत आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर श्री सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक श्री योगेश हिवसे यांचे नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे पोहवा विनोद वानकर, पोअं. कोमल मोहजे, प्रतिक हेमके, धिरज भोयर, मपोअ सुचीता उमरे सर्व पोस्टे पडोली यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments