पंतप्रधानांनी त्यांच्या धोरणांद्वारे आणि कृतींद्वारे स्पष्ट संदेश दिला आहे की त्यांच्यासाठी भारताचे आणि भारतीयांचे कल्याण सर्वात महत्त्वाचे आहे.
मा. कृष्णा गजबे यांचे प्रतिपादन
देसाईगंज येथील सिंधू भवन येथे विकसित भारत संकल्प सभा उत्साहात संपन्न
देसाईगंज:-
मोदी सरकारच्या गेल्या ११ वर्षांत, भारताने सर्वांगीण आणि समावेशक विकासाची नवीन उंची गाठली आहे. मग ती गरीब, शेतकरी, महिला यांच्या उन्नतीसाठी कल्याणकारी योजना असोत किंवा आर्थिक विकासाला गती देण्यासाठी पायाभूत सुविधा असोत. पायाभूत सुविधांचा विकास असो किंवा वैज्ञानिक संशोधनाला चालना असो, प्रत्येक क्षेत्रात जोरदार काम झाले. या काळात, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली, आम्ही जगातील सर्वात मोठा आर्थिक समावेशन कार्यक्रम "जन धन योजना" आणि आरोग्य क्षेत्रासाठी एक योजना सुरू केली. आयुष्मान भारत योजना जनतेपर्यंत यशस्वीरित्या पोहोचवण्यात आली. गेल्या ११ वर्षात, पंतप्रधानांनी त्यांच्या धोरणांद्वारे आणि कृतींद्वारे स्पष्ट संदेश दिला आहे की त्यांच्यासाठी भारताचे आणि भारतीयांचे कल्याण सर्वात महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांनी केले. ते दिनांक १६ जुन २०२५ रोजी देसाईगंज येथील सिंधू भवन येथे विकसित भारत संकल्प सभाच्या कार्यक्रमाप्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे मा. आमदार कृष्णाजी गजबे, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे मा. आमदार डॉक्टर नामदेवराव उसेंडी, किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रमेशजी भूरसे, लोकसभा निवडणूक प्रमुख तथा भाजपा मा. जिल्हाध्यक्ष किशनजी नागदेवे, भाजपा जिल्हा सचिव डॉक्टर भारतजी खटी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्ष शालूताई दंडवते व देसाईगंज तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.
यावेळी देसाईगंज तालुक्यातील मौजा कुरुड ग्रामपंचायतीच्या नवनियुक्त सरपंच सौ. प्रीतीताई मडावी यांचा उपस्थित प्रमुख अतिथी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष सचिन खरकाटे यांनी केले तर सूत्रसंचालन तालुका अध्यक्ष सुनील पारधी यांनी केले. व आभार चैतनदाजी विधाते यांनी मांनले. यावेळेस भारतीय जनता पार्टीचे तालुका पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments