बालपणापासूनच शिक्षणाची गोडी निर्माण करून यशोशिखर गाठावे.


बालपणापासूनच शिक्षणाची गोडी निर्माण करून यशोशिखर गाठावे.

शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांचे प्रतिपादन..!

मौशीखांब- मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील गडचिरोली तालुक्यातील सतरा गावातील शेकडो शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व मिठाईचे वाटप.



गडचिरोली, 
शिक्षण हे अज्ञानरूपी अंधकार दूर करून यशस्वी आणि आंनदी जिवनाच्या प्रकाशाकडे वाटचाल करणारे माध्यम आहे. त्यामुळे आपले जीवन सुगंधी फुलासारखे फुलवायचे असेल तर बालपणापासूनच शिक्षणाची गोडी निर्माण झाली पाहिजे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी बालपणापासूनच ज्ञानरूपी अमृत प्राशन करून जिद्द चिकाटीने मेहनत करून यशोशिखर गाठावे आणि आपल्या गावाचाच नव्हे तर आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, असे मौलिक प्रतिपादन उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसपंर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केले.
उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसपंर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी आपल्या विविध उपक्रमांचा भाग म्हणून शिवसेना पक्षप्रमुख मा. उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील सतरा गावातील शाळांमधील शेकडो विद्यार्थ्यांच्या सानिध्यात साजरा केला. प्रत्येक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व मिठाईचे वाटप करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत केला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अरविंदभाऊ कात्रटवार पुढे म्हणाले की, आजचे विद्यार्थी देशाचे भविष्य आहे. त्यामुळे बालपणापासूनच विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार झाले पाहिजे. शिक्षणात गरीब आणि श्रीमंत असा कोणताही भेदभाव नसतो. बालपणापासूनच विद्यार्थ्यांना चांगले संस्कार व योग्य मार्गदर्शन मिळण्याची गरज आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणामध्ये मोठी आमलाग्र बदल घडून आला आहे. शिक्षणाचा अधिकार कायद्यान्वये प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्वक शिक्षण दिले पाहिजे. पुर्वीपेक्षा आता ग्रामीण भागातील शैक्षणिक दर्जा सुधारला आहे. विद्यार्थ्यांना भौतिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांना शाळेप्रती गोडी निर्माण करून विद्यार्थी शाळेत कसा रममान होईल यादृष्टीने शैक्षणिक वातावरण निर्माण करणे सुध्दा तेवढेच आवश्यक असल्याचे अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले.
मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रत्येक गावातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारला पाहीजे. या क्षेत्रातील यासाठी आपण प्रयत्नशिल असून शैक्षणिक विकासासंदर्भात कोणतीही समस्या असल्यास आपणास अवगत करून द्यावी, समस्या शासन व प्रशासनदरबारी लावून धरून सोडविण्यास आपण सदैव तत्पर असल्याची ग्वाही अरविंदभाऊ कात्रटवार यांनी दिली. मा. उध्दवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य आयोजित करण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमाचे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व नागरिकांनी प्रशंसा केली.
यावेळी यादवजी लोहंबरे, संजय बोबाटे, नवनाथ उके, प्रशांत ठाकुर, संदिप आलबनकर, सुरज उईके, दिपक लाडे, अमित बानबले, संदिप भुरसे, विलास दासगाये, गोपाल मोगरकर, विलास वासेकर, स्वप्निल धोडरे, चंद्रभान नैताम,  तुषार बोरकर, खुशाल आवारी, सचिन भरणे, विजय भरणे, उमाकांत हर्षे, कैलाश फुलझेले, गौरव हर्षे, हरिदास हर्षे,  हरबाजी दासगाये, तानबा दासगाये, रामदास बह्याल, निकेश लोहंबरे, प्रविण निसार, नेपाल लोहंबरे, मिथुन चापडे, जीवन कुरटकार, यादव चौधरी, शिवम लोहंबरे, जीवन कुकडकार, दिलीप चनेकार, अंबादास मुनघाटे, दिलीप वलादी, निकेश मडावी, विनोद मुत्यमवार, स्वप्निल मोदेकर, रमेश चौधरी, मोहन सोरते, हिवराज वाकडे, रविंद्र सावसाकडे, प्रेमदास जांभुळकर, बालाजी बाबनवाडे, अनिल दोडके, प्रकाश नागपूरे, निलकंठ रणदिवे, बापू भादे, पांडूरंग धानफोले, सुरेश मसराम, मंगेश कांबडी, सुधाकर सावसागडे, राजु जवादे, अरुण बारापात्रे, संजय मेश्राम, दशरथ चापडे, रत्नाकर रंधये, उमाजी चनेकार, वसंत आभारे, रमेश सिडाम, मयुर भोयर, महेश लाजुरकर, अंकुश झाडे, पंकज चनेकार, खुशाल मेश्राम, प्रांजल कोलते, पराग कुमरे, पुरुषोत्तम चनेकार, दुर्वेश मुनघाटे, सुभाष देशमुख, भाऊराव मुनघाटे, गुरुदेव गोहणे, कुणाल पेंदाम, अमर निंबोड, अनंत हुलके, राहुल मडावी, भक्तदास खेवले, सुरज टेकाम, गुरुदेव सेलोटे, कवळूजी धंदरे, गणेश खेवले, सचिन भरणे आदि मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments