गडचिरोलीतील निरपराध नागरिकांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी शासनाला मागणी.
मा.उध्दवसाहेब ठाकरे यांची नागपूरात शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार यांनी घेतली भेट.
गडचिरोली,
गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब मुरमाडी, जिल्हा परिषद क्षेत्रातील येणाऱ्या गाव परिसरात वाघांनी मागील एक- दीड वर्षापासून धुमाकुळ घातला असून नरभक्षक वाघ नागरिकांच्या जीवावर उठले आहेत. आतापर्यंत नरभक्षक वाघाने तब्बल २७ निरपराध नागरिकांचा बळी घेतला आहे. मात्र राज्य शासन व त्यांचा वनविभाग सुस्त आहे. नागरिकांकडून वनविभागाप्रती संताप व्यक्त केला जात आहे. यापुढे नागरिकांचे जीव जाऊ नये यासाठी नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी शासनास भाग पाडा, असे साकडे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा.उध्दवसाहेब ठाकरे यांना भेट देऊन निवेदन दिले .
शिवसेना पक्षप्रमुख मा.उध्दवसाहेब ठाकरे हिवाळी अधिवेशनानिमित्य नागपूरात आले असता अरविंद कात्रटवार यांनी त्यांची भेट घेऊन नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याबाबत निवेदन देऊन लक्ष वेधले.
कात्रटवार यांनी मा.उध्दवसाहेब ठाकरे यांच्या लक्षात आणून दिले की, गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब मुरमाडी व जिल्हा परिषद क्षेत्रातील झुडपी जंगलात वाघांची संख्या वाढली आहे. यातील काही वाघ नरभक्षक आहेत. नरभ़क्षक वाघांनी आतापर्यंत २७ शेतकरी, नागरिकांचा बळी घेतला आहे एका नरभक्षक वाघीनीने तब्बल ७ नागरिकांवर हल्ला करून ठार केले आहे
व्याघ्रबळीच्या घटना या शेतात काम करीत असतांना घडल्या असून वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामावर परिणाम झाला आहे.
वनविभागाने नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी मोहिम राबविली. परंतू त्यास अपयश आल्याने नरभक्षक वाघ आणखी आक्रमक होऊन शेतात काम करीत असलेले महिला, शेतकरी यांच्यावर हल्ले करीत आहे. नरभक्षक वाघाला पकडण्यात वनविभागाला अपयश आले असून त्यास वनविभागाचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे.नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त न केल्यास आणखी काही नागरिकांचे बळी जाण्याची भिती निर्माण झाली आहे. शासन व वनविभागाप्रती नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. या गंभिरबाबीची दखल घेऊन गडचिरोतील नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी भाग पाडावे व वन प्रशासनाला योग्य त्या सुचना द्याव्यात, अशी मागणी शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार यांनी मा.उध्दवसाहेब ठाकरे यांच्याकडे केली. नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याबाबत शासनाला सुचना केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख मा.उध्दवसाहेब ठाकरे यांनी अरविंद कात्रटवार यांना दिली. याप्रसंगी यादवजी लोहबरे,संजय बोबाते, सप्निल खांडरे, ज्ञानेश्वर बानबले,संदीप भुरसे,आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थितीत होते.
0 Comments