भारतीय जनता पार्टी देसाईगंज तालुक्याची मंडल बैठक आमगाव येथील श्रीराम मंदीर येथे संपन्न


भारतीय जनता पार्टी देसाईगंज तालुक्याची मंडल बैठक आमगाव येथील श्रीराम मंदीर येथे संपन्न 


 देसाईगंज:- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या सूचनेनुसार तथा आरमोरी विधानसभा क्षेत्राचे विधानसभा प्रमुख श्री. प्रकाशजी सावकार पोरेड्डीवार यांच्या मार्गदर्शनात तथा आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वात राष्ट्रपतीचे अभिभाषण व महाराष्ट्र राज्याच्या युती सरकारच्या अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी आज दिनांक 10 जुलै 2024 रोजी आमगाव येथील श्रीराम मंदिर येथे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे विधानसभा प्रमुख तथा सहकार महर्षी मा. श्री. प्रकाशजी सावकार पोरेड्डीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका मंडल बैठक संपन्न झाली.

 राष्ट्रपती अभिभाषण व युती सरकारच्या अर्थसंकल्पाचे मुद्दे पुढीलप्रमाणे.

 1. महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प मांडणी
 2. राष्ट्रपती अभिभाषण वाचन 
 3. कार्यकर्ता संवाद.

वरील विषयाची मंडळ बैठकीत विस्तृत मांडणी करून कार्यकर्त्यांना "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीन योजना" थकीत वीज बिल माफ, मुलींसाठी मोफत शिक्षण, मोफत वीज, मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी, महिलांकरिता, युवाकरिता, अपंगांकरिता, शेतकऱ्यांसाठी, अर्थसंकल्पात केलेली तरतूद कार्यकर्त्यांनी प्रत्येक बुथावर, गावागावात पोहोचवण्याचे कार्य करावे, यावेळी महत्वाचे म्हणजे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यां सोबत संघटनात्मक चर्चा करून लोकसभा निवडणुकीमध्ये बूथ निहाय झालेल्या मतदानाचा आढावा घेऊन ज्या बुथावर भारतीय जनता पक्षाला कमी प्रमाणामध्ये मत मिळालेले आहेत. त्या बुथावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून बूथ सशक्तिकरण करण्याचे आव्हान आरमोरी विधानसभा क्षेत्राचे विधानसभा प्रमुख श्री. प्रकाशजी सावकार पोरेड्डीवार यांनी पदाधिकाऱ्यांना केले.

याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते रामभाऊ पडोळे गुरूजीतथा गडचिरोली जिल्हा महामंत्री सदानंदजी कुथे सर, पंचायत समितीचे माजी उपसभापती गोपालजी उईके सर इतरही मान्यवरांनी मंडळ बैठकीत मार्गदर्शन केले.

या मंडल बैठकीला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे विधानसभा प्रमुख प्रकाशजी सावकार पोरेड्डीवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते रामभाऊ पडोळे गुरूजी, गडचिरोली जिल्हा महामंत्री सदानंदजी कुथे सर, पंचायत समितीचे माजी उपसभापती गोपालजी उईके सर, तालुका अध्यक्ष (ग्रामीण) सुनीलजी पारधी, तालुकाध्यक्ष (शहर) सचिनजी खरकाटे, आमगाव येथील ज्येष्ठ नागरिक तथा श्रीराम मंदिराचे विश्वस्त ठाकरेजी  तसेच देसाईगंज तालुक्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 या कार्यक्रमाचे संचालन तालुकाध्यक्ष सुनीलजी पारधी यांनी केलं तर आभाप्रदर्शन शहर तालुकाध्यक्ष सचिन खरकाटे यांनी केले.

Post a Comment

0 Comments