खरीप हंगाम पिक विम्यास ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे
देसाईगंज-
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२३ ते रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राज्यात राबविण्यास दि.२६ जुन २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात आलेली आहे.या योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२४ करीता सहभागाची अंतीम मुदत १५ जुलै पर्यंत निश्चित करण्यात आली होती.त्यात आता ३१ जुलै २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी केले आहे.
केंद्र शाषनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार प्रधानमंत्री पिक विमा योजनेची १५ जुलै २०२४ पर्यंत शेतकरी सहभागाची अंतीम मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र योजनेत सहभागासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने संचालक,कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांचे पत्र फ-क्र १३०१२/१०/२०१६-क्रेडिट दि.१५ जुलै २०२४ पत्रान्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरून प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२४ मध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यास ३१ जुलै २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
दरम्यान सदरच्या कालावधीत जास्तीत जास्त शेतकरी सहभागी होण्यासाठी संबंधित विमा कंपनिने आवश्यक ती प्रसिद्धी व प्रचार मोहित राबविण्यासंदर्भांत सुचना दिल्या असल्याची माहिती आमदार गजबे यांनी दिली आहे.केंद्र शासनाने जारी केलेल्या निर्देशानुसार प्रधानमंत्री पिक विमा योजनेस ३१ जुलै २०२४ पर्यंत मुदतवाढ दिल्याने या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहनही गजबे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
0 Comments