वर्ग 3 व 4 ची पदभरती स्थानिक पातळीवरच केली जावी - मंत्री धर्मराव बाबा आत्राम

वर्ग 3 व 4 ची पदभरती स्थानिक पातळीवरच केली जावी - मंत्री धर्मराव बाबा आत्राम



गडचिरोली,
जिल्ह्यातील युवकांनी मोर्चा काढत वर्ग 3 व 4 ची भरती जिल्ह्यातच घेण्यात यावी अशी मागणी घेऊन मोर्चा काढला होता यावर आज मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी आपली प्रतिक्रिया दिली
गडचिरोली जिल्ह्यात वर्ग 3 व 4 ची पदभरती जिल्ह्यामध्येच घेण्यात यावी जेणेकरून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील
बाहेर जिल्ह्यातील कर्मचारी गडचिरोली जिल्ह्यात 1-2 वर्ष काम करून बदली करून घेतात यामुळे जिल्ह्यात बहुतेक जागा रिक्त राहतात
जिल्ह्याचा युवक हा सेवानिवृत्त होईपर्यंत जिल्ह्यातच सेवा देईल यामुळे रिक्तपदाचा ताण येणार नाही
वर्ग 3 व 4 यांची पदभरती हे जिल्ह्यातच झाली पाहिजे असे माझे वयक्तिक मत आहे व ही मागणी मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पर्यंत पोहोचविणार असे प्रतिपादन महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.

Post a Comment

0 Comments