निरोगी शरीर ठेवण्यासाठी खेळ महत्वाचे -आमदार कृष्णा गजबे
कोरची:- तालुक्यातील भटगाव येते क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आमदार कृष्णा गजबे हे होते.उद्घाटन म्हणून जयराम कोरेटी हे होते. प्रमुख अतिथी तालुका महामंत्री गुड्डूभाऊ अग्रवाल, साळुंखे, शिंदे, श्रावण मातलाम, इंदल कुमरे,रामलाल मुलेटी,नारद फुलारे, सदाराम नुरुटी माजी पंचायत समिती सदस्य, शामलाल नरोटे,सेसकुराम नरोटे पोलीस पाटील,जे.बी. टेकाम,देवराम कुमोटी, प्रेमलाल उसेंडी,प्रेमसिंग हलामी,जोहर कोरेटी,सचिन टेंभुर्णे,निरंजन मडावी, रामलाल कोरेटी ही होते. यावेळी अध्यक्ष स्थानावरून आमदार कृष्णा गजबे म्हणाले की,निरोगी शरीर ठेवण्यासाठी खेळ महत्त्वाचे असून निरोगी शरीरात निरोगी मन राहते. क्रिकेट हा एक प्रसिद्ध आणि रोमांचक खेळ आहे. खेळामध्ये मनोरंजनासोबत शरीराचा व्यायाम पण होतो खेळामुळे शरीर सुदृढ आणि मजबूत बनते.
या कार्यक्रमा प्रसंगी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकित भारतीय जनता पक्षाने तिसऱ्यांदा उमेदवाऱी दिल्याने आमदार कृष्णा गजबे यांचा स्वागत करण्यात आला.
0 Comments