वन्य हत्तींचा बंदोबस्त करा विजय गोरडवार यांची मागणी


वन्य हत्तींचा बंदोबस्त करा
विजय गोरडवार यांची मागणी

गडचिरोली: शहरापासून तीन किलोमीटर असलेल्या सेमाना मंदिर परिसरात दिनांक २९ सप्टेंबरच्या २०२४ च्या रात्री वनहत्तींचा कळप लोकांच्या निदर्शनास पडला, त्यात ज्या मार्गाने हत्तींचा आगमन झाला त्यात अनेक शेतकऱ्यांचा आता तोंडाशी आलेला घास मोठ्या प्रमाणात नासधूस झाला. ज्या ज्या शेतकऱ्यांचा पिकांचा नुकसान झाला अशा सर्व शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात यावे. आणि हत्तींसह अन्य वन्य जीवांचा सतत चाललेला धुडगूस पथक तैनात करून वनविभागाने आटोक्यात आणावा जेणेकरून सर्वसामान्यांना वन्यप्राणी हिंसाचारापासून रोखता येईल. याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गडचिरोली शहराध्यक्ष विजय गोरडवार यांच्या नेतृत्वात नुकतेच मुख्य वनसंरक्षक एस रमेशकुमार वनविभाग गडचिरोली यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष शेमदेव चाफले, जिल्हा उपाध्यक्ष नईम शेख, जिल्हा महिलाचिटणीस ऋतुजा कन्नाके (सोरते), जिल्हा युवक सरचिटणीस राकेश नाहीत, अल्पसंख्याक शहराध्यक्ष शाहरुख पठाण, युवा नेते विवेक कांबडे, महिला शहर उपाध्यक्ष नईमा हुसेन, शहर सरचिटणीस मंजुषा लांबट, युवा कार्यकर्ते अमान सय्यद आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments