सतीनदीचा रपटा तात्काळ दुरुस्त करून सायकल व दुचाकी वाहकांचा प्रवास सुकर करा - आमदार कृष्णा गजबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

सतीनदीचा रपटा तात्काळ दुरुस्त करून सायकल व दुचाकी वाहकांचा प्रवास सुकर करा

आमदार कृष्णा गजबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

कुरखेडा:
कुरखेडा तालूका मूख्यालयाशी ग्रामीण भागाला जोडणारा सतीनदीचा पूलाचे बांधकाम सूरू असल्याने तयार करण्यात आलेला रपटा पहिल्याच पावसात वाहून गेल्याने येथून कोरची, मालेवाडा,कढोली तसेच नदीपलीकडील गावाकडे जाणारा महत्वाचा मार्ग बंद झालेला असून तालुका मुख्यालयी विविध कामाकरता येण्याकरिता नागरिकांना 20 किलोमीटरचा फटका सहन करावा लागत असल्याने प्रशासनाने दुचाकी चालक व सायकल चालक व पायी जाणाऱ्या वाटसरूना  या मार्गावरून आवागमन करण्यासाठी तात्काळ रपट्याची दुरुस्ती करून मार्ग सुरू ठेवावा असे निर्देश आमदार कृष्णा गजबे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

गोटणगाव, जांभुळखेडा, मालदुगी, शिवणी, चांदागड इथून येणाऱ्या नागरिकांना सरासरी 24 किलोमीटरचा फरक पडत असल्याने तयार केलेला रपटा तात्काळ दुरुस्त करून वाटसरू सायकलस्वार व दुचाकी वाहकांना जाण्याकरिता हा मार्ग सुकर होईल असे कुरखेडा येथील जाणकार व्यक्तीचे मत आहेत. तयार करण्यात आलेल्या रपट्याची दुरुस्ती पुल तयार होई पर्यंत नेहमी कंत्राटदारांनी करावे असे आदेश आमदार कृष्णा गजबे यांनी दिले आहे.

यावेळी तुटलेल्या रपट्याची पाहनी करतांना आमदार कृष्णा गजबे, भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, शहर विचार मंच संयोजक माधवदास निरंकारी, जिल्हा महामंत्री रविंद गोटेफोडे, गणपत सोनकुसरे, नगरसेवक अँड उमेश वालदे, भाजपा शहर अध्यक्ष सागर निरंकारी, उल्लाष देशमुख व कुरखेडा येथील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments