विजेचे बिल मिळतच नाही; ग्राहक पैसे भरणार तरी कसे ? , कंत्राटदारावर कारवाईची मागणी - रूपेश वाळके


ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त : कंत्राटदारावर कारवाईची मागणी 


गडचिरोली : प्रत्येक महिन्याचे वीज
बिल ग्राहकाला उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महावितरणची आहे. यासाठी महावितरणने कंत्राटदार नेमला आहे. मात्र, कंत्राटदाराचे मजूर प्रत्यक्ष ग्राहकाच्या घरी वीज बिल पोहोचवत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. वीज बिल मिळालेच नाही, तर भरायचे कसे, असा प्रश्न ग्राहकांसमोर निर्माण होतो. त्यामुळे अनेक ग्राहक वीज बिल भरत नाहीत.
वीज ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर वीज बिलाची रक्कम उपलब्ध करून देण्याची सुविधा महावितरणने सुरू केली आहे. याचा लाभ शहरातील ग्राहकांना सर्वाधिक होतो. महावितरणच्या सिस्टीममध्ये बिल जनरेट होताच संबंधित ग्राहकाला वीज बिलाची रक्कम माहीत होते. शहरातील अनेक ग्राहक फोन पे, गुगल पे आदींच्या माध्यमातून वीज बिल भरतात. संबंधित अॅपसुद्धा वीज बिलाच्या रकमेचे संदेश ग्राहकांना देतात. मात्र, खरी अडचण ग्रामीण

महावितरणने गो ग्रीन ही सुविधा सुरू केली आहे. यामध्ये संबंधित ग्राहकाला कागदी वीज बिल पाठविले जात नाही. ई-मेलवर वीज बिलाची प्रत पाठविली जाते. त्याला १० रुपये प्रति बिल सूट दिली जाते. मात्र, या योजनेची महावितरणने प्रसिद्धी केली नसल्याचे दिसून येत आहे.
भागातील ग्राहकांची आहे. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांकडे अजूनही मोबाइल नाही. गावात कव्हरेज राहत नाही. शहरातीलही काही नागरिकांकडे मोबाइल राहत नाही. त्यामुळे त्यांना
टपरीवर मिळते वीज बिल

वीज बिल वाटप करणाऱ्या कंत्राटदाराचे मजूर दर महिन्याला बदलतात. त्यांना घरे माहीत राहत नाहीत. त्यामुळे ते प्रत्येक घरी वीज बिल नेऊन न देता एखाद्या चहा टपरीवर किंवा दुकानात सगळी वीज बिले ठेवत असल्याचे प्रकार वाढले आहेत.
महावितरणने सुरू केलेला गो-ग्रीन हा सर्वांत चांगला पर्याय
वीज बिल मिळत नसल्याच्या तक्रारी गडचिरोली शहरात वाढल्या आहेत. वीज बिल मिळत नसल्याने ग्राहकांच्या लक्षात राहत नाही. त्यामुळे वीज बिल भरलेसुद्धा जात नाही. महावितरणने संबंधित
कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी आहे.
वीज बिल किती आले याची माहिती मिळत नाही. महावितरणमार्फत घरी पोहोचविण्यात आलेल्या कागदी बिलाच्या माध्यमातून वीज बिलाची रक्कम कळते. त्यानंतर ते बँकेत जाऊन
प्रत्येक
ग्राहकाच्या घरापर्यंत वीज बिल उपलब्ध करून देणे ही महावितरणची जबाबदारी आहे. वीज बिल वितरण करणाऱ्या कंत्राटदारावर महावितरणचे नियंत्रण नाही. त्यामुळे कंत्राटदार प्रत्येक ग्राहकाला वीज बिल उपलब्ध करून देत नाही.

- रूपेश वाळके, ग्राहक

वीज बिल वितरणासाठी प्रामुख्याने अल्पवयीन मुलांचा वापर केला जातो. ही मुले थेट गावातील एखादी पानटपरी शोधतात. त्या ठिकाणी संपूर्ण गावची बिले ठेवून परत जातात. त्यामुळे अनेकांना वीज बिल मिळत नाही. परिणामी, बिलाचा भरणा केला जात नाही.
पैसे भरतात. बँकेमध्ये वीज बिल भरतेवेळी ग्राहक क्रमांक टाकावा लागतो. मात्र, अनेकांना ग्राहक क्रमांक लक्षात राहत नाही. परिणामी, वीज बिल भरले जात नाही.

Post a Comment

0 Comments