वसा .. पोर्ला जिल्हा परिषद निर्वाचन क्षेत्रासाठी विकासाचा नवीन चेहरा सुषमा विनोद दशमुखे इच्छुक.

वसा .. पोर्ला जिल्हा परिषद निर्वाचन क्षेत्रासाठी विकासाचा नवीन चेहरा सुषमा विनोद दशमुखे इच्छुक.
गडचिरोली,
पोर्ला जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुषमा विनोद दशमुखे ह्या इच्छुक आहेत.
वसा - पोर्ला जि.प निर्वाचन क्षेत्र महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्यामुळे या निर्वाचन क्षेत्रात पुरुषांचा हिरमोड झालेला आहे. इच्छुक असलेले भाजपाचे विलास दशमुखे, प्रशांत वाघरे, रत्नदिप म्हशाखेत्री राष्ट्रवादीचे हेमंत रामटेके, शंकरराव इंगळे, सुजित राऊत आदिचा सुद्धा हिरमोड झालेला असून आता काग्रेस, भाजपा व राष्ट्रवादी महिला उमेदवारांच्या शोधात आहेत. माजी उपसभापती विलास केशवराव दशमुखे ह्यांच्या सुषमा विनोद दशमुखे ह्या वहिनी असून वसा - पोर्ला जि.प क्षेत्रात विलासराव परिचयाचे असुन त्यांनी सदर क्षेत्रात केलेला विकास व कार्य आजही नागरिकांच्या लक्षात असुन सुषमाला भाजपाकडून उमेदवारी मिळाली तर त्या सदर क्षेत्राचा विकास करू शकतात एवढे मात्र निश्चित. विलास दशमुखे यांचा जनसंपर्क, विकासाची कामे करण्याची शैली लक्षात घेता भाजपाला असा तोडीचा उमेदवारही शोधुन सापडणार नाही. देशमुख परिवार गेल्या २० वर्षी पासून पोर्ला या गावी राहून तेथील गोर -गरीब जनतेच्या कामाला धाऊन जनतेच्या अळचणीला मदत केली आहे
विलास केशवराव दशमुखे हे मागील वर्षी पंचायत समिती सभापती राहून या क्षेत्रात खूप विकास कामे केले आणि शासनाकडून ज्या योजना आहे ते सर्व साधारण माणसाला मिळावे म्हणून अहो रात्र काम करीत होते

Post a Comment

0 Comments