सुरेश सावकार पोरड्डीवार २७ ला कांग्रेसमधे प्रवेश करणार. कविता सुरेश पोरड्डीवार कांग्रेसची नगराध्यक्ष पदाची उमेदवार पक्की

सुरेश सावकार पोरड्डीवार २७ ला कांग्रेसमधे प्रवेश करणार. कविता सुरेश पोरड्डीवार कांग्रेसची नगराध्यक्ष पदाची उमेदवार पक्की

गडचिरोली:
-राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे तथा माजी नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरड्डीवार परवा दिनांक २७ ऑक्टोंबर २०२५ ला कांग्रेसच्या भव्य मेळाव्यात आपल्या असंख्य कार्यकर्त्या सहीत आमदार विजयभाऊ वडेट्टिवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करून कांग्रेसचा दुपट्टा बांधणार आहेत आणि कांग्रेसचा मेळावा सुद्धा सुरेश सावकार पोरड्डीवार यांच्या घरासमोरील भव्य आवारात आहे.गडचिरोली नगराध्यक्ष पदाची जागा महिला ओपण असल्यामुळे व जनतेतून निवडून घ्यावयाची असल्यामुळे कांग्रेसच्या भव्य मेळाव्यात सुरेश सावकार पोरड्डीवार यांची पत्नी प्राचार्य कविता सुरेश सावकार पोरड्डीवार यांचाही पक्ष प्रवेश असुन त्या याच कार्यक्रमात कांग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून जाहीर होणार आहेत.सुरेश सावकार पोरड्डीवार हे गडचिरोली नगर परिषदेचे पहिले नगराध्यक्ष होत . मागील २०१९ च्या गडचिरोली नगरपरिषद च्या निवडणुकीत कविता पोरड्डीवारअगदी थोड्या फरकाने पडल्या होत्या. आता कांग्रेसच्या पंज्या चिन्हावर उभ्या राहणार असल्यामुळे कांग्रेसमधे नवचैत्यन निर्माण झालेले आहे. तर भाजपाकडे गिता हिंगे किंवा योगीता पिंपरे यापैकी एकाला भाजपाची तिकीट मिळणार आहे. कविता पोरड्डीवार यांच्या कांग्रेस प्रवेशामुळे व नगराध्यक्ष पदाच्या तिकीटामुळे भाजपाला धक्काच बसणार असला तरी भाजपा सत्ताधारी पक्ष असल्यामुळे माजी खासदार अशोक नेते आमदार डॉ. मिलिंद नरोटे व माजी आमदार डॉ. देवराव होळी माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी आदि दिग्वज नेत्यामधे एकत्र बसुन खलबते सुरु असुन भाजपाचा नगराधक्ष पदाचाउमेदवार कोण असला पाहिजे यांची चाचपणी सुरू आहे.

Post a Comment

0 Comments