धान पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी - गोगावचे सरपंच राजू उंदीरवाडे
गडचिरोली : मागील चार दिवसांपासून
जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. यामुळे मध्यम कालावधीच्या धानाचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी गोगावचे सरपंच राजू उंदीरवाडे यांनी केली आहे. गडचिरोली, गोगाव,अडपली, दिबणा, आंबेशिवणी ,या गावातील शेतकरी कुटुंबातील नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी शासनाने पंचनामे करा .मध्यम कालावधीचे धान परिपक्व झाले असल्याने या धानाची कापणी सुरू आहे. अशातच जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस कोसळत आहे. अवकाळी पावसामुळे धानाच्या कडपा पाण्यात भिजत आहेत. सततच्या पावसामुळे धान ओले होऊन काही धानाला कोंब फुटले आहेत.
त्यामुळे संबंधित यंत्रणेने लवकर पंचनामे करावे, अशी मागणी राजू उंदीरवाडे यांनी केली आहे.
मागणी,
शेतात साचले पाणी
१
ज्या शेतकऱ्यांचे शेत सकल भागात आहे, अशा शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे धानाच्या कडपा पाण्यात ओल्या होत आहेत.
२
या कडपा उचलाव्या लागत आहेत. यासाठी मजूर लावावे लागत आहेत. हा अतिरिक्त खर्च प्रशासनाला करावा लागत आहे.

0 Comments