एटापल्ली तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भोंगळ कारभार
दुर्गम भागातील खातेदारांची हेळसांड ,
कलम 353 मध्ये अडकवण्याची सामान्य माणसाला धमकी झाली हत्यार
तालुका प्रतिनिधी एटापल्ली,
एटापल्ली येथील गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेत तालुक्यातील अतिदुर्गम भागातील नागरिकांचे विशेष म्हणजे महिलांचे खाते दिवसेंदिवस वाढत चालले असून सदर बँकेत मागील काही महिन्यात अनेक खातेदार सोबत बँकेतील अधिकारी कर्मचारी खातेदारांची पात्रता पाहून वागणूक देत असून गोर गरीब आदिवासी बहुल जनतेच्या, कामाला भेदभाव करत असल्याचे प्रकरण रोजच्या रोज समोर येत असून दिनांक 29 सप्टेंबर रोजी तुकाराम चोपंडीवर या खातेदाराने एका खासगी नेट कॅफे (CSP) केंद्रावरून पैसे काढले असता पैसे न निघता खात्यामधून कटल्याने त्याने बँकेत जाऊन विचारणा केली त्याला बँकेत 7 ते 8 दिवसात पैसे परत जमा होतील असे सांगण्यात आले परंतु चोदंडीवर हे त्या CSP केंद्र चालकाला पैसे देण्यास तगादा लावल्याने केंद्र चालक श्रीकांत श्रीकुचीवर हे बँकेत जाऊन नियम सांगितल्याने असता बँकेकडून त्याचे काही ऐकून न घेता त्याला शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी केस करण्याची धमकी देत त्याच्यावर दडपन टाकण्याचा प्रयत्न केला वेळीच तिथे हजर असलेले नागरिकांनी बँकेत नियमाने काम n करता उलट केस ची धमकी कसे देता म्हणून गोंधळ केल्याने लगेच 5 मिनिटात शाखा व्यवस्थापकाने त्या खातेदाराचे पैसे जमा करून दिल्यामुळे बँकेच्या कार्यप्रणाली वर प्रश्न निर्माण होत असून या वरून गोरगरीब जनतेला माहिती नसल्या अभावाने येरझार चकरा मारावे लागत असल्याचे दिसून येते सदर बँकेत असे अनेक प्रकरण झाले असून बांधकाम सभापती निर्मला कोंडबतूलवार याचे सोबत हा प्रकार घडला असून कलम 353 ची धमकी देण्यात आली होती हे विशेष म्हणजे या सर्व प्रकारची घटना एका तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत होत असेल तर इतर तालुक्यातील शाखेतील काम कसे होते याचा अंदाज सामान्य माणसाला सांगण्याची गरज नाही आता असे प्रकरणात गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापक काय भूमिका घेणार यांच्या कडे लक्ष ठेवून राहिले.
0 Comments