गडचिरोली - दिनांक ७ आँगस्त २०२४ ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ९ वे राष्ट्रीय अधिवेशन अमृतसर ,पंजाब राज्यात येथे आयोजीत करण्यात आले आहे. सदर अधिवेशनाच्या तयारीच्या दृष्टीने नागपूर येथे रविवार दिनांक ५ मे २०२४ बैठकीचे आयोजन धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर दुपारी १२ वाजता बैठकीचे आयोजन कऱण्यात आले होते, या बैठकीत जातीनिहाय जनगणना करण्यात यावी. केंद्रामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी.ओबीसी समाजाला लावण्यात आलेली क्रीमिलेयरची घटनाबाह्य अट त्वरित रद्द करण्यात यावी व ती रद्द होईपर्यंत क्रीमिलेयरची मर्यादा २० लाख रुपये करण्यात यावी. मंडल आयोग आणि स्वामिनाथ आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करण्यात याव्या. ओबीसी प्रवर्गाचा अँट्रासिटी कायद्यामध्ये समावेश करण्यात यावा. इतर मागण्या मजूर करून घेण्यासाठी आणि राष्ट्रिय ओबीसी महासंघाच्या वर्ष भरातील कार्यक्रम ठरविण्यासाठी ,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजीत करण्यात आली होती. अध्यक्षीय भाषणात बोलताना डॉ तायवाडे म्हणाले की, राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आतापर्यंत आठ राष्ट्रीय अधिवेशने व राज्य व विभागीय स्तरावर विविध अधिवेशने घेतली तसेच अन्नत्याग , साखळी उपोषणे व विविध आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारला तब्बल ४४ शासन निर्णय काढायला भाग पाडले.अजून ओबीसींच्या बऱ्याच महत्त्वाच्या मागण्या प्रलंबित आहेत यासाठी ओबीसी बांधवांनी आपल्या न्याय हक्कासाठी महाधिवेशनात मोठ्या संख्येने सामील व्हा ! असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी प्रास्ताविक करताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर यांनी आज पर्यंत झालेल्या अधिवेशन बद्दल माहिती दिली. यावेळी मान्यवराच्या हस्ते ९ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे लोगो व स्टीकर्स यांचे विमोचन करण्यात आले. बैठकीत राष्ट्रीय समन्वयक डॉ.अशोक जिवतोडे ,उपाध्यक्ष शेषराव येलेकर, कोषाध्यक्ष गुनेश्वर आरिकर, सहसचिव शरद वानखेडे , राज्य उपाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महीला महासंघाच्या अध्यक्षा सुषमाताई भड, महाराष्ट्र महिला अध्यक्षा ज्योतिताई ढोकने , राष्ट्रीय युवा अध्यक्ष, सुभाष घाटे , ऋषभ राऊत, परमेश्वर राऊत, रुंदाताई ठाकरे, किरण देरकर, अपर्णा पाटील, अर्चना भोमले, विदर्भ कार्याध्यक्ष शकील पटेल , राजू चौधरी , ओबीसी योध्दा रवींद्र टोंगे , विजय पटले, विनोद हजारे, शुभम वाघमारे निलेश खोडे, पराग वानखेडे, रुतीका डफ, नागपूर जिल्हा युवा अध्यक्ष अनिलभाऊ चानपुरकर ,पराग वानखेडे ,सूरज नेवारे, तसेच ओबीसी महासंघ ,महिला महासंघ, युवा - युवती महासंघ, कर्मचारी महासंघ, किसान महासंघ, विद्यार्थी महासंघ , वकील महासंघ तसेच सर्व राष्ट्रीय पदाधिकारी , महाराष्ट्र कार्यकारिणी , विदर्भ कार्यकारिणी , सर्व जिल्हाध्यक्ष व तालुका अध्यक्ष व सर्व कार्यकर्त् बैठकीला उपस्थित होते.
0 Comments