गडचिरोली विधानसभा क्षेत्रात दोन वेळा भाजपाचे आमदार व मागील विधानसभा ,लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सोबत हातमिळवणी करुन काम केलेल्या माजी आमदाराच्या पत्नीस यावेळेस भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषदेची तिकीट देऊन काय साध्य करणार ?..

  गडचिरोली विधानसभा क्षेत्रात दोन वेळा भाजपाचे आमदार व मागील विधानसभा ,लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सोबत हातमिळवणी करुन काम केलेल्या माजी आमदाराच्या पत्नीस यावेळेस भारतीय जनता पार्टी 
जिल्हा परिषदेची तिकीट देऊन  काय साध्य करणार ?..
गडचिरोली,
गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या व ज्या जिल्हा परिषद क्षेत्रात हजारो कोटीचे काम चालणारे लॉयड मेटल कंपनी आहे त्या  दुर्गापूर वायगाव जिल्हा परिषद क्षेत्रातून यावेळेस सर्वसाधारण महिलाचा आरक्षण आहे तरी या क्षेत्रातुन  अनेक दिग्गज उभे आहेत यापैकी अनेक निष्ठावान कार्यकर्ते हे निवडणुकी तिकिटाच्या शर्यतीत आहेत त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे व त्यांनी केलेला काम हा अभूतपूर्व आहे परंतु दुर्गापुर वायगाव जिल्हा परिषद क्षेत्रात या विधानसभा क्षेत्रातील माजी आमदार यांनी आपल्या पत्नीला जिल्हा परिषद निवडणुकीत उतरवण्याचा  घाट घातलेला आहे व त्यामुळे संपूर्ण विधानसभा मतदारसंघात विविध चर्चेला उधाण आलेलं आहे मागील विधानसभा निवडणुकीत विद्यमान भाजप उमेदवाराला कोणत्याही प्रकारचे सहकार्य न करता आपल्या कार्यकर्त्यासहित पूर्णपणे काँग्रेसला मदत करणारे माजी आमदार त्याचप्रमाणे मागील लोकसभा  निवडणुकीत खासदार अशोक नेते यांच्या विरोधात आपल्या विधानसभा मतदारसंघात खुलेआम पैसे वाटून अशोक नेते यांना पाडण्याचे व काँग्रेस उमेदवार निवडून आणण्याचे जोरदार कार्य या माजी आमदार महोदयाचे आहे त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या रहिवाशी नगरपंचायत क्षेत्रात संपूर्ण नगरपंचायत क्षेत्र काँग्रेसला विकून टाकण्याचे महापाप व महाप्रताप या माजी आमदाराचे आहे याच कारणामुळे या आमदारांना या विधानसभा निवडणुकीत या दोनदा आमदार राहून सुद्धा पक्षाने तिकीट नाकारले व त्यांना डच्चू दिला ? व आता पुन्हा त्यांना सत्तेची लालसा निर्माण झाली व आधीच त्या भागामध्ये त्यांच्यामुळेच भाजपाचे समस्त कार्यकर्ता हे विरोधात व नाराज आहेत त्याचप्रमाणे पैशाच्या लालसेपोटी या माजी आमदार महोदयांनी  संपूर्णपणे त्या भागामध्ये असणाऱ्या लायड मेटल्स कंपनीच्या घशामध्ये या भागातील बंगाली समाजाचे व आदिवासी व इतर समाजाचे जमिनी टाकण्यासाठी या भागातून त्यांच्या पत्नीचा नाव त्यांनी समोर करून निष्ठावान कार्यकर्त्यांना बाजूला सारण्याचे प्रकार सुरू केले आहेत या सर्व प्रकाराबद्दल गडचिरोली जिल्ह्यातील तमाम आदिवासी व इतर तसेच प्रामुख्याने बंगाली समाजाने नाराजी व्यक्त केली आहे  व निषेध सुद्धा व्यक्त करीत आहेत या भागामध्ये जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यांनाच भाजपचे तिकीट देण्यात यावी अशी मागणी दुर्गापुर वायगाव जिल्हा परिषद निर्वाचन क्षेत्रातून सामान्य नागरिक मतदार बांधव यांच्या कडून करून राहिलेले  आहेत तरी वरिष्ठ  भाजपचे नेते या विषयावर काय भूमिका घेणार ,त्याच प्रमाणे एक माजी आमदार आता काय ग्रामपंचायत लढणार काय ? असे गडचिरोली विधानसभा विधानसभा क्षेत्रात चरचा सुरु आहे


Post a Comment

0 Comments