एटापल्ली पोलिसांच्या तत्परतेने टळली मोठी दुर्घटना!

एटापल्ली पोलिसांच्या तत्परतेने टळली मोठी दुर्घटना! 
एटापल्ली ,
दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी सुमारास 12 वाजता एटापल्ली पोलीस हद्दीत गस्त घालत असताना गुरुपल्ली परिसरात एक पांढऱ्या रंगाची दुचाकी (MH 34 AW 7415) अचानक पेट घेत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
तात्काळ पोलिसांनी चातुर्य दाखवत गाडी थांबवली आणि दुचाकीवरील व्यक्ती रमेश शेगमवार यांना सुरक्षित स्थळी हलवले. जवळच्या घरातून पाणी आणून तसेच घटनास्थळी आलेल्या सुरजगड कंपनीच्या पेट्रोलिंग वाहनातील फायर एक्स्टिंग्विशरच्या मदतीने स्कूटीवरील आग आटोक्यात आणण्यात आली.
या प्रसंगी एटापल्ली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गजानन साखरे, पोहवा भीवा हिचामी, पोशी मोहन शिंदे, चापोशी जयराम पुंगाटी, तसेच सुरजगड कंपनीचे राजू तुंबडे व पुणे नामनवार यांनी दाखवलेली सतर्कता आणि तत्परता यामुळे एक मोठी दुर्घटना टळली.
 स्थानिक नागरिकांकडून पोलिसांच्या तातडीच्या आणि धाडसी कृतीचे कौतुक होत आहे.
एटापल्ली पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं — “सेवा, सुरक्षा आणि शांती” ही त्यांची केवळ घोषणा नसून कृतीतून सिद्ध केलेली भूमिका आहे

Post a Comment

0 Comments