रामनगर (कॅम्प एरिया) येथे भव्य रक्तदान शिबिर,आरोग्य तपासणी शिबिर तसेच आयुष्यमान भारत कार्डचे वाटप

रामनगर (कॅम्प एरिया) येथे भव्य रक्तदान शिबिर,आरोग्य तपासणी शिबिर तसेच आयुष्यमान भारत कार्डचे वाटप


भाजपतर्फे मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त रामनगर (कॅम्प एरिया) हनुमान मंदिर येथे "सेवा सप्ताह पंधरवाडा" कार्यक्रम

*गडचिरोली ,

     मा. पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त "सेवा सप्ताह पंधरवाडा" या कार्यक्रमांतर्गत भारतीय जनता पार्टी गडचिरोली शहराच्या वतीने स्थानिक रामनगर (कॅम्प एरिया) येथिल हनुमान मंदिरामध्ये भव्य रक्तदान शिबिर,आरोग्य तपासणी शिबिर व आयुष्यमान भारत कार्डची नोंदणी व वितरण करण्यात आले.
     या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते तर जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे,जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे,जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.  
   याप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी बीपी,शुगर ची तपासणी करून घेतली.तसेच रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यानी रक्तदान केले
    जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. व आरोग्य सेविका यांच्या चमुने आरोग्य तपासणी करून उपचार मार्गदर्शन केले. तर आशा सेविका यांनी आयुष्यमान भारत कार्डची नोंदणी करून कार्डचे वितरण केले.
   कार्यक्रमाला जिल्हा सचिव वर्षा शेडमाके,शहराध्यक्ष कविताताई उरकुडे,भाजयुमो जिल्हाध्यक्ष अनिल तिडके,जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर,जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी,अविनाश महाजन,श्रीकांत पतरंगे,माजी नगरसेविका अल्काताई पोहनकर,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष दिपक सातपुते,शहर महामंत्री हर्षल गेडाम,गजेंद्र डोमळे,आरोग्य सेविका,आशा सेविका,भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments