अहेरीतील कंकडालवार यांच्या बहुमजली इमारतीने इतर 60 लोकांना संकाटात ओढले, अहेरीतील आदिवासींच्या जमीनी खरेदी करणा-या इतर अनेक गैरआदिवासींना देखील संकटाचा सामना करावा लागणार काय?

अहेरीतील कंकडालवार यांच्या बहुमजली इमारतीने इतर 60 लोकांना संकाटात ओढले,
  अहेरीतील आदिवासींच्या जमीनी खरेदी करणा-या इतर अनेक गैरआदिवासींना देखील संकटाचा सामना करावा लागणार काय?
अहेरी:- येथील गावठाणात समाविष्ठ असलेले नगर भूमापन क्रमांक 51/1 व 51/2 ही जमीन मुळ आदिवासी प्रवर्गाच्या भूधारकाची असून त्याचे मुळ मालक शंकर सन्यासी सिडाम, कंडय्या सन्यासी सिडाम, भिमराव संन्यासी सिडाम, श्रीमती सुमित्रा सन्यासी सिडाम, श्रीमती यधदा बिचु मडावी व श्रीमती गवरूबाई बिचु सन्यासी हे होते. सदर शेती त्यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता खरेदी विक्री केली असल्यामुळे दोषीवर फौजदारी गुन्हा नोंद करावी अशी मागणी तिरूपती बाजीराव मडावी, रा. इंदाराम यांनी 05 सप्टेंबर 2022 ला अहेरीच्या उप विभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी अर्जाद्वारा केली होती. त्यावर 3 वर्षापासून कुठलीच कारवाई करण्यात आली नव्हती. पण सदर जागा ही अजय कंकडावालर यांच्या विवादास्पाद बहुमजली इमारत असलेली व लगतची असल्याचे कळताच चक्रे फिरली आणि या जमीन खरेदी विक्रीतील सुमारे 60 लोकांना अहेरीच्या उप विभागीय अधिकारी यांनी नोटीसा पाठविले असल्याची माहिती मिळाली आहे. त्यावर येत्या 6 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.
हे अहेरी येथील जुना सर्वे नंबर 505/3, 505/4 क्षेत्र 2.43 हे. आर. जमीन असून सदर जमीनीचा नगर भूमापन क्रमांक 51 क्षेत्र 24300 चै.मी. पैकी कंडय्या सन्यासी सिडाम व इतर आदिवासी खातेदार यांचे कडून क्षेत्र 150 चै.मी. जमीन खरेदी केल्याचे मालमत्ता दिसून आल्याने वरिल सर्व 60 लोकांना नोटीस पाठवून जमीनीचा अकृषक आदेश, अकृषक लेऑऊट तसेच सदर जमीन आदीवासीची असतांना आपण खरेदी करतांना शासनाची परवानगी तसेच खरेदी विक्री व्यवहाराची प्रत ईत्यादी संपुर्ण दस्ताऐवजासह दिनांक 06 जानेवारीए 2026 रोजी दुपारी 12.00 वाजता उपस्थित राहण्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, अहेरी कळविले आहे.
या नोटीसामुळे मोठया किमतीत येथील जमीन खरेदी केलेल्या व त्यावर ‘‘गगनचुंबी’’ इमारती बांधलेल्यांचे धाबे तर दणाणले आहेच या प्रकरणात शासनाच्या परवानगी शिवाय खरेदी केलेल्या जमीनीं पुन्हा आदिवासींना परत देण्यात आल्यास अहेरी आणि आजु बाजुच्या गावात याची प्रतिक्रिया उमटणार आणि अनेक प्रकरणे समोर येण्याची शक्यता  नाकरता येणार नाही. त्यामुळे अहेरी परिसरात मोठे वादळ उठणार आहे.
वादची सुरवात कुठून झाली?
अहेरीतील एक प्लाॅट व्यवसायी वरिल जमीन आदिवासी मुळ जमीन मालकापैकी एकाच्या नावाने खेरेदी केली होती. याची माहिती मिळताच अहेरी येथे वास्तव्य करणाऱ्या एका राजकिय नेत्याने ज्या आदिवासी मुळ मालकाच्या नावाने जमीन खरेदी करण्यात आली होती त्याला विश्वासात घेतले आणि गडचिरोली येथे नेवून त्याच्याकडून (पैस दिले की नाही माहित नाही) अनेक प्लाॅट खरेदी करून घेतले. तेथून जमीन खरेदी विक्री प्रकरणात विवाद सुरू झाले. तत्पूर्वी म्हणजे तो राजकिय नेता प्लाॅट खेरेदी करण्यापूर्वीच 2022 मध्यचे अहेरीच्या उप विभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार करविली होती असे कळते.

Post a Comment

0 Comments