चामोर्शी शहरात हजारो नागरिक व बालगोपाल यांच्या उपस्थितीत साजरा झाला भव्य तान्हा पोळा उत्सव
नगरसेवक आशीष भाऊ पिपरे व नगरसेविका प्रेमाताई आईंचवार यांचा पुढाकार
चामोर्शी ,
येथील बाजार चौक येथील मैदानात शहरातील तान्हा पोळा उत्सव समिती यांच्या वतीने नगरसेवक आशीष भाऊ पिपरे यांच्या पुढाकाराने आयोजित भव्य तान्हा पोळा उत्सव कार्यक्रमात कार्यक्रमाच्या उद्घाटक प्राचार्य हिराजी बनपुरकर व अध्यक्ष प्रकाशजी गेडाम व प्रमुख पाहुणे ,पोलीस निरीक्षक पाटील साहेब , नगरसेवक आशीष भाऊ पिपरे, सामाजिक कार्यकर्ते अमोल भाऊआईंचवार ,राजेश भाऊ ठाकूर ,त्रियुगी दुबे ,धनराज वासेकर , अशोक धोडरे नगरसेविका सौ प्रेमा ताई आईंचवार, नगरसेविका सौ सोनाली ताई पिपरे ,इलेश भाई गांधी , हनुमंतजी डांबारे ,संतोष पालारपवार, ओमदास झरकर , अमर वरगंटीवार , माणिक कोहळे राजू धोडरे, सोपान नैताम ,कार्यक्रमाचे प्रायोजक ,कल्याणी ज्वेलर्सचे चिमड्यालवार,शुभम एंटरप्राईजेसचे आईंचवार बंधू ,राजा गोपीचंद किरानाचे प्रफुल भांडेकर, कवीश्वर आईंचंवार , साई हार्डवेअरचे राहुल पालारपवार, बंडू नैताम उपस्थित होते उपस्थितांचे तान्हा पोळा आयोजन समितीचे वतीने वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर सेवक आशीष भाऊ पिपरे यांनी केले यावेळी एकूण ब्यानशी स्पर्धकांनी सहभाग घेतला ,सर्व स्पर्धकांना प्रोत्साहन बक्षिसे राजा गोपीचंद किराणा स्टोर व इसाफ ,बँक तसेच डॉ ,प्रांजली आईंचवार यांचे कडून देण्यात आले दोन गटातील एक ते सहा या गटात प्रथम पहिले बक्षीस पाच हजार रुपये ,द्वितीय बक्षीस तीन हजार रुपये तृतीय बक्षीस दोन हजार पाचशे रुपये व व्दितीय गटात प्रथम बक्षीस सात हजार रुपये द्वितीय बक्षीस पाच हजार रुपये तृतीय बक्षीस तीन हजार रुपये देण्यात आले
विजेता स्पर्धकांना उपस्थित उद्घाटक प्राचार्य हिराजी बनपुरकर व अध्यक्ष प्रकाशजी गेडाम तसेच उपस्थित प्रमुख पाहुणे यांचे हस्ते बक्षिसाचे वितरण करण्यात आले स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांचे परीक्षण श्री गोटमुकुलवार सर, सौ भारती तितरे ,सौ सीमा ताई खोबे ,सौ त्रीकांडे यांनी केले कार्यक्रमाचे संचालन प्रा,किशोर ओल्लालवार व आयोजक रमेश अधिकारी यांनी केले या कार्यक्रमात धडक महाराष्ट्र लावणी नृत्य ग्रुपची जोरदार प्रस्तुती करण्यात आली व कार्यक्रमाला शहरातील नागरिक व बालगोपाल यांनी प्रचंड प्रतिसाद दिला कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी तान्हा पोळा उत्सव समिती चामोर्शी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अथक प्रयत्न केले
0 Comments