आलापल्ली वनपरिक्षेत्राधिकारी यांचा कोट्यवधींचा घोटाळा!
आलापल्ली वनपरिक्षेत्राधिकारी यांना तात्काळ निलंबित करा अन्यथा ठिय्या जनआंदोलन
राष्ट्रीय मानवाधिकार संघटना व भ्रष्टाचार निर्मूलन संघटनांचा इशारा!
गडचिरोली,
आलापल्ली वनविभागाच्या आलापल्ली वनपरिक्षेत्रांत बोगस मजुरांच्या नावावर खोट्या स्वाक्षऱ्या दाखवून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून अफरातफर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून आलापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी "गौरव गणवीर" यांचं नाव पुढे आलं असून, त्यांना तात्काळ निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करून शासन सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे. या गंभीर गैरव्यवहाराबाबत आज राष्ट्रीय मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) श्री. रमेश कुमार यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आलं. या निवेदनात स्पष्ट नमूद करण्यात आलं की, मजुरांच्या नावाने खोट्या साक्षऱ्या, आरटीजीएस दुसऱ्यांच्या नावावर, तर वाउचर वेगळ्या नावाने दाखवण्यात आले असून, यामागे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संगनमत आहे.
संघटनांनी या संपूर्ण घोटाळ्याचे ठोस पुरावे या आधी सादर केले असूनही अद्याप कारवाई न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर जर दहा दिवसांच्या आत संबंधितांवर कार्यवाही न केल्यास, येत्या 17 ऑक्टोबर 2025 पासून मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर ठिय्या जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनांनी दिला आहे. व प्रामुख्याने आलापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी यांचा वनपरिक्षेत्र पेरमिली येथील प्रभार असताना सुद्धा त्यावेळी त्या ठिकाणी सुद्धा या वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी अनेक बोगस कामे केलेली आहेत. तसेच आपल्या खाली काम करणाऱ्या छोट्या कर्मचाऱ्यांना सुद्धा या वनपरिक्षेत्र महोदय यांनी हिटलरशाहीची वागणूक दिलेली आहे.याबाबत सुद्धा लवकरच सर्व विषय पत्रकारां
समोर पत्रकार परिषद घेऊन उघड करण्यात येणार आहे. या सर्व विषयाचे सबळ पुरावे वनविभागास सादर करण्यात आलेली आहे
या वेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष शंकर भाऊ ढोलगे, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा भाऊ वाघाडे, माहिती अधिकार संघटणाचे युवा नेते सूरज हजारे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
“घोटाळेबाजांना संरक्षण देणाऱ्यांनाही सोडणार नाही, अन्यथा तीव्र जणआंदोलन छेडू,” असा इशारा राष्ट्रीय मानवाधिकार संघटना व भ्रष्टाचार निर्मूलन संघटना जिल्हा गडचिरोली यांनी दिला आहे.
0 Comments