एटापल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयात वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा
शशांक नामेवार एटापल्ली तालुका प्रतिनिधी
एटापल्ली,
वन्यजीवांचे संरक्षण, संवर्धन आणि जागरुकता वाढवण्याच्या उद्द्देशाने महाराष्ट्रासह भारतभर 1 ऑक्टोंबर ते 07 ऑक्टोंबर था कालावधीमध्ये कन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो- भामरागड वनविभागांतर्गत येत असलेल्या एटापल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयामार्फत यावर्षीसुद्धा विविध उपक्रम राबवून वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.
सप्ताहाच्या पहिल्या दिवशी वनवसाहत परिसर एटापल्ली येथे वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविण्यात आले तसेच अंधश्रद्धा निर्मुलनपर प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दुसऱ्या दिवशी म. गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करून स्वच्छता अभियान वनकर्मचायाद्वारे राबविण्यात आले. तिसया दिवशी तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये वन्यप्राण्यांविषयी आवड निर्माण होण्याच्या लॉयइस राज विदयानिकेतन हेडरी येथील विदयार्थ्यांसाठी कमलापुर हत्ती कॅम्प येथे सहलीचे आयोजन करण्यात आले. चौथ्या दिवशी परिक्षेत्रातील गंदा, पुरसलगोंदी, पेन, लांबडा, परसलगोंदी मोहुर्ली हालेवारा या गावांमध्ये विदयार्थ्यांची प्रभात फेरी तसेच ग्रामस्थांसमोर वन्यजीवांचे पर्यावरणामध्ये असलेले महत्व वनकर्मचायांद्वारे सांगण्यात आले. एटापल्ली, गंदा व लोडसा येथील शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली पाचव्या दिवशी एटापल्ली येथे वृक्ष आपल्या दारी अभियान राबवून नागरिकांना घरपोच रोपांचे वाटप करण्यात आले. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्येक विभागामध्ये होत असलेला वापर वनविभागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असुन त्याचाच एक भाग म्हणुन विभागातील युवा वनकर्मचारी तसेच लॉयइस मेटल येथील निवडक कर्मचाऱ्यांसाठी ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण सप्ताहाच्या सहाव्या दिवशी देण्यात आले. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी परिक्षेत्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी एटापल्ली शहरात बाईक रॅली काढण्यात आली. व निबंध स्पर्धेतील विजेते आणि परिक्षेत्रातील मध्ये वर्षभरात उत्कृष्ट कार्य केलेल्या वनकर्मचायांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
0 Comments