लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी सुरजागड आयर्न ओर माईन्स तर्फे हेडरी येथे दहा दिवसीय चिल्ड्रेन समर कॅम्पचे बक्षीस वितरण सोहळा

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी सुरजागड आयर्न ओर माईन्स तर्फे हेडरी येथे दहा दिवसीय चिल्ड्रेन समर कॅम्पचे बक्षीस वितरण सोहळा

उप विभागीय पोलीस अधिकारी बाबुराव दादास यांच्या हस्ते वितरण
अहेरी:- गडचिरोली जिल्ह्यातील एटापली तालुक्यातील हेडरी येथे लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी सुरजागड आयर्न ओर माईन्स तर्फे मौजा  हेडरी मैदानात दहा दिवसीय चिल्ड्रेन समर कॉम्पचे बक्षीस उपविभागीय पोलीस अधिकारी बाबुराव दादास यांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी हेडरी चे उपसरपंच राकेश कावडो, हेडरी पोलीस पाटील सौरभ कावडो, माजी सरपंच काटिया तेलामी आदी मंचावर उपस्थित होते.
दिनांक २९ एप्रिल ते ०८ मे पर्यंत एकूण दहा दिवसीय चिल्ड्रेन समर कॉम्पचे आयोजन करण्यात आलं आहे. यात एथलेटिक, व्हालीबॉल, धनुरविद्या, कबड्डी, फूटबॉल, योगा इत्यादी खेळाचे समावेश आहे. प्रत्येक खेळात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पठाकविलेल्या खेळाडूंना आकर्षक बक्षीस देऊन खेळामध्ये सहभाग घेतलेल्या २५० विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, व शालेय बॅग देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी मोठया संख्याने नागरिक उपस्थित होते

Post a Comment

0 Comments