जिल्हा गडचिरोली विश्व हिंदू परिषद बजरंग दल कडून काँग्रेस पार्टीचा तीव्र जाहीर निषेध.विश्व हिंदू परिषद बजरंग दल जिल्हा गडचिरोली कडून काँग्रेस पार्टीचा तीव्र जाहीर निषेध.


गडचिरोली,
बजरंग दल हे एक राष्ट्रवादी संघटण आहे.सतत आतंकवाद्यांच्या आतंकवादाला,नक्षलवादाला,जातीय वादाला,अजमल कसाब,अफजल गुरू, शाहीन बाग ह्या सारख्या राष्ट्रविरोधी शक्तीला समर्थन संकुचित विचार सरणीच्या पक्षाकडून राष्ट्रीय स्तरावर रक्तदान करणाऱ्या ,संकट काळात राष्ट्रीय कार्यात सहभाग देणाऱ्या,आतंकवाद,नक्षलवाद , जिहादी मनोवृत्ती व लव्हजिहाद या सारख्या गंभीर समस्येशी लढणाऱ्या बजरंग दलाची तुलना PFI सारख्या देशविरोधी आतंकी संघटनेशी करीत असेल तर हे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. व राष्ट्रवादी संघटन बजरंग दल बंद करणार असा घोषणा पत्र मध्ये लिहिलेल्या कांग्रेस पार्टीचा तीव्र जाहीर निषेध व्यक्त करून इंदिर गांधी चौक गडचिरोली काँग्रेस पार्टीचा जाहीर निषेध अश्या घोषणा देण्यात आल्या. त्याप्रसंगी विश्व हिंदू परिषद चे नगराध्यक्ष नितेश दादा खडसे, बजरंग दलचे जिल्हा संयोजक सचिन ठाकूर, विश्व हिंदू परिषद चे उपाध्यक्ष रोशन खडसे, गोरक्षा प्रमुख विशाल दादा बिजवे, गणेशजी नैताम, बालाजी भांडेकर, नीलेशजी सोमनकर, सुयोग गुरणुले, व विश्व हिंदू परिषद बजरंग दल चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत.

Post a Comment

0 Comments