अतिवृष्टीने घर कोसळलेल्या महिलेला शिवसेना (उबाठा) चे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी दिला आधार.
गडचिरोली,
गडचिरोली तालुक्यातील मौशिखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील गिलगाव येथील सिंधूबाई भरणे या महिलेस दिली आर्थिक मदत.
मागील आठवडाभर गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे गिलगाव येथील सिंधूबाई मुर्लीधर भरणे या महिलेचे घर कोसळले. घराची पडझड झाल्याने सिंधुबाई समोर निवाऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. याबाबतची माहिती उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांना मिळताच त्यांनी शिवसैनिकांसोबत गिलगाव येथे जाऊन सिंधूबाई भरणे यांना आर्थिक मदत दिली. तसेच शासनाकडून तातडीने नुकसान भरपाई मिळवून देण्याची ग्वाही कात्रटवार यांनी याप्रसंगी दिली.
*उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसपंर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांचा मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात तगडा जनसंपर्क आहे. या क्षेत्रातील कोणतीही समस्या त्यांच्यापर्यंत पोहचल्यास समस्या सोडविण्यासाठी ते जनतेच्या मदतीसाठी धावून जातात. कात्रटवार यांनी या क्षेत्रातील रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य यासह शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे.
*अरविंदभाऊ कात्रटवार यांनी गरजवंत महिला सिंधुबाई भरणे यांची मदत करून सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडविले आहे. त्यांच्या हातून सदैव सत्कार्य घडो, जनता नेहमी त्यांच्या पाठीशी राहिल, अशी भावना गिलगाव येथील नागरिकांनी व्यक्त केली. यावेळी यादवजी लोहंबरे, संजय बोबाटे, नवनाथ उके, प्रशांत ठाकुर, संदिप आलबनकर, सुरज उईके, दिपक लाडे, अमित बानबले, संदिप भुरसे, विलास दासगाये, गोपाल मोगरकर, विलास वासेकर, स्वप्निल धोडरे, चंद्रभान नैताम, तुषार बोरकर, खुशाल आवारी, सचिन भरणे, विजय भरणे, उमाकांत हर्षे, कैलाश फुलझेले, गौरव हर्षे, हरिदास हर्षे, हरबाजी दासगाये, तानबा दासगाये, रामदास बह्याल, निकेश लोहंबरे, प्रविण निसार, नेपाल लोहंबरे, मिथुन चापडे तसेच गिलगाव येथील नागरिक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments