गडचिरोली जिल्हा क्रीडांगण व चामोर्शी तालुका क्रीडांगणाच्या व संकुलसाठी क्रीडामंत्री ना. संजयजी बनसोडे यांनी बैठक

गडचिरोली जिल्हा क्रीडांगण व चामोर्शी तालुका क्रीडांगणाच्या व संकुलसाठी  क्रीडामंत्री ना. संजयजी बनसोडे यांनी बैठक 

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या विनंतीवरून क्रीडा मंत्र्यांनी केली बैठकीची सूचना
पुढील आठवड्यात मंत्र्यांच्या दालनात बैठक


गडचिरोली,
दिनांक २९ जून मुंबई गडचिरोली जिल्हा क्रीडा स्टेडियमच्या व चामोर्शी तालुका क्रीडा संकुलाच्या बांधकाम संदर्भात आपल्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करावे अशी विनंती आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी क्रीडामंत्र्यांकडे पत्राद्वारे केली असता क्रीडामंत्री ना. संजय जी बनसोडे यांनी बैठक आयोजित करण्याबाबत आपल्या विभागाला निर्देश दिले आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात बैठक होणार आहे.
 गडचिरोली जिल्हा स्टेडियमचे बांधकाम मागील अनेक वर्षांपासून अतिशय संथगतीने सुरू असून, त्या कामाला गती देण्याची आवश्यकता आहे. वनविभागाच्या ताब्यात असलेल्या स्टेडियमच्या जागेचा ताबा घेऊन बांधकामाच्या दुसऱ्या टप्प्यातील अंदाजपत्रकाला मंजुरी देण्याची आवश्यकता आहे. चामोर्शी तालुका क्रीडा
संकुलाच्या बांधकामाला गती मिळावी, चामोर्शी तालुका
क्रीडांगणाच्या जागेवर असलेले अतिक्रमण काढून काम
सुरू करणे आवश्यक आहे.

Post a Comment

0 Comments