महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना गडचिरोली यांचा अनोखा उपक्रम ! श्री. गणेशोत्सव विसर्जना निमित्ताने आपल्या कर्तव्य बजावत असणाऱ्या सर्व पोलीस व कर्मचारी यांना संघटनेतर्फे पाणी बॉटल, फळ,बिस्किट वाटप

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना गडचिरोली यांचा अनोखा उपक्रम !
 श्री. गणेशोत्सव विसर्जना निमित्ताने आपल्या  कर्तव्य  बजावत असणाऱ्या सर्व पोलीस व कर्मचारी यांना  संघटनेतर्फे पाणी बॉटल, फळ,बिस्किट वाटप
गडचिरोली :  गडचिरोली शहरात विविध ठिकाणी  सार्वजनिक गणरायाची  प्रतिष्ठापना करण्यात आले होते. शनिवार ला  श्री   गणेश विसर्जन निमित्ताने शहरातील  विविध ठिकाणाहून  ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आले.
पोलिस उपाशी राहू देणार नाही हा संकल्प जोपासत शहरातील विविध भागातील गणेशोत्सव  विसर्जन मिरवणूकी दरम्यान  कायदा सुव्यवस्थेच्या  दृष्टीने पोलीस प्रशासन  अहोराञ आपले   कर्तव्य पार पाडत असताना तसेच बंदोबस्त वर  असलेले पोलीस अधिकारी , कर्मचारी  ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी   संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी   कॉम्प्लेक्स परिसर, चामोर्शी रोड, आरमोरी रोड, धानोरा रोड, व मूख्य  इंदिरा गांधी चौक ते  बाजार तलाव  या    परिसरातील तैनात असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना सामाजिक आपुलकी जोपासत पाणी बॉटल ,बिस्कीट, फळे वाटप करण्यात आले व त्यांचे अडिअचणी जाणून घेतले.
 या उपक्रमाला प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सन्माननीय निलोत्पल साहेब व श्री जगताप साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली तसेच श्री विनोद चव्हाण साहेब ठाणेदार गडचिरोली पोलीस स्टेशन यांचे संघटनेला प्रामुख्याने मार्गदर्शन लाभले.
 या कार्यक्रमाचे यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष संदीप पैदापल्ली जिल्हा सचिव रोशन कवाडकर जिल्हा कार्याध्यक्ष सागर हजारे जिल्हा उपाध्यक्ष हारीस हकीम जिल्हा सहसचिव अक्षय इंगळे शहराध्यक्ष अनुराग कुडकावार जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सुरज गुंडमवार शहर सचिव मिथुन देवगडे शहर सहसचिव शुभम वानखेडे तालुकाध्यक्ष राजकुमार महावे तालुका उपाध्यक्ष संतोष पडिहार तालुका सचिव राकेश बच्चालवार व तसेच विशाल मदेशी राकेश पाल बंटी राठोड फिरोज लालनी प्रणय  डबरे अंशुल जैन व सर्व पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments