१९ ऑगस्टच्या पुसेर पेथील आदिवासी मेळाव्यात सहभागी व्हाः आ. डॉ. देवराव होळी
गडचिरोली,
समाज बांधव आणि आमदार डॉ. देवराव होळी मित्र परिवाराच्या वतीने १९ ऑगस्टला पुसेर येथे आदिवासी समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आ.डॉ. देवराव होळी यांनी केले आहे.
आ.डॉ. देवराव होळी यांनी आपल्या आमदार निधीतून पुसेर परिसरात विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतून अनेक कामे होणार असून, त्यांचे भूमिपूजन १९ ऑगस्टला सकाळी ११ वाजता आ.डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी आयोजित मेळाव्यात आदिवासी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आ.डॉ. देवराव होळी यांनी केले आहे.
0 Comments