आमदार कृष्णा गजबे यांनी केला होता पाठपुरावा
देसाईगंज-
उद्योग विरहित गडचिरोली जिल्ह्यात सद्या स्थितीत पावसाने थैमान घातले असता मोठ्या प्रमाणात उन्हाळी शेत पिकाचे नुकसान झाल्याचे वास्तव समोर येत आहे. अशातच शासकीय खरेदी केंद्रावरून मका खरेदी सुरु करण्यात न आल्याने शेतकऱ्यांतुन असंतोष खदखदु लागला होता. ही गंभीर बाब लक्षात घेता आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांनी मा.ना.श्री. रवींद्रजी चव्हाण अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांचेकडे पाठपुरावा करून यथाशिघ्र मका खरेदी करण्या संदर्भात पाठपुरावा केला असता अखेर ४ मे पासुन मका खरेदी संदर्भात राज्य शासनाचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले असल्याने मका खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे.
किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत पणन हंगाम २०२२-२३ मध्ये भरडधान्य खरेदी कार्यान्वित करणे,खरेदीसाठी शेतकरी ऑनलाईन नोंदणी करणे व अभिकर्ता संस्थांना खरेदीचे उद्दिष्ट नेमून देण्या संदर्भात अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने ३ मे २०२३ रोजीच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देशीत करण्यात आले आहे.केंद्र शासनाने दिलेल्या मंजुरीनुसार पणन हंगाम २०२२-२३ रब्बी मध्ये मका, ज्वारी खरेदीसाठी अभिकर्ता संस्थां यात मार्केटिंग फेडरेशनला ६ लाख क्विंटल मका,१ लाख ३६ हजार क्विंटल ज्वारी तर आदिवासी विकास महामंडळाला ३२ हजार क्विंटल मका व ३३ हजार क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
उपरोक्त अभिकर्ता संस्थांना ४ मे २०२३ पासुन ३० जुन २०२३ पर्यंत खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. शासन निर्णयान्वये राज्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत पणन हंगाम २०२२-२३ रब्बी मध्ये धान,भरडधान्य खरेदीस मंजुरी देण्यात आली आहे. संबंधित अभिकर्ता संस्थांकडून प्राप्त माहितीनुसार पणन हंगाम २०२२-२३ रब्बी मध्ये राज्यात भरडधान्य खरेदीचा सुधारीत आराखडा केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता.त्यास केंद्र शासनाने मान्यता देऊनही खरेदीस विलंब होत असल्याचे पाहु जाता आमदार गजबे यांनी २ मे २०२३ रोजी शासनाच्या अन्न व पुरवठा विभागाशी पञव्यवहार करून वस्तुस्थिती अवगत करुन दिली होती.त्या अनुषंगाने राज्य शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मका खरेदीचे निर्देश दिले असल्याने आता खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत सर्वसामान्य शेतकऱ्यांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने पणन हंगाम २०२२-२३ रब्बीसाठी निश्चित केलेल्या खरेदी कालावधीत भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी होणाऱ्या शेतकऱ्यांचे तत्काळ शेड्युलिंग करून खरेदी प्रक्रिया पुर्ण करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात व भरडधान्य खरेदीचा तपशील शासनास वेळोवेळी सादर करण्याचे निर्देश राज्य शासनाचे कक्ष अधिकारी विजय मोरे यांच्या स्वाक्षरीनिशी पञ जारी करण्यात आले आहे.यासाठी आमदार गजबे यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश आल्याने शेतकरी वर्गातून आमदार गजबे यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments