चंद्रखंडी ते कसनसुर मार्गाची दुरुस्ती होणार; रस्ते गड्डेमुक्त – भाकपाच्या मागणीला यश

चंद्रखंडी ते कसनसुर मार्गाची दुरुस्ती होणार; रस्ते गड्डेमुक्त – भाकपाच्या मागणीला यश  
एटापल्ली :  
चंद्रखंडी माता मंदिर ते कसनसुर दरम्यानचा मुख्य रस्ता गेल्या काही महिन्यांपासून निकृष्ट दर्जामुळे व खड्ड्यांमुळे जनतेच्या हालअपेष्टेचा विषय ठरला होता. शेतमाल बाजारात घेऊन जाणे, रुग्णांना वेळेवर दवाखान्यात पोहोचवणे, शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास, या सर्वांनाच या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता. अनेकदा अपघात होऊन छोटे-मोठे जीवितहानीचे प्रकारदेखील नोंदले गेले.  
या संदर्भात  भारतीय कम्युनिस्ट पार्टीने सातत्याने पाठपुरावा करून संबंधित विभागाकडे तक्रार नोंदवली होती.** तसेच चौकशी करून रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाने करणाऱ्या ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणीही करण्यात आली होती.  
या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने लेखी माहिती देत कॉ. सचिन मोतकुरवार, भाकपा जिल्हा सहसचिव यांना कळवले आहे की, पावसाळा संपल्यानंतर रस्त्यावरील सर्व खड्डे DBM ने भरले जातील व त्यावर BC थर टाकून रस्ता गड्डेमुक्त करण्यात येईल.
नागरिकांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले  रस्त्याची देखभाल नियमितपणे व्हावी, भविष्यात पुन्हा खड्डेमय परिस्थिती उद्भवू नये यासाठी ठोस योजना आखावी, अशीही मागणी होत आहे. **पावसाळ्यापूर्वी उखडणारा डांबरी थर, अपूर्ण व निकृष्ट दर्जाचे काम, यामागे ठेकेदार व शासकीय अधिकाऱ्यांचा संगनमताचा प्रश्न असल्याचे नागरिक व्यक्त करत आहेत.
भाकपाच्या मागणीला यश मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान निर्माण झाले 
 निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर व निष्क्रिय शासकीय यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी भाकपा करत राहणार असल्याचे कॉ. मोतकुरवार यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments