विसापूर हेटी येथील हनुमान मंदिरांतील हनुमानाचा चांदीच्या मुकुट चोरीला गेला .

विसापूर हेटी येथील हनुमान मंदिरांतील
हनुमानाचा चांदीच्या मुकुट चोरीला गेला .




गडचिरोली :
 गडचिरोली शहरालगत 7 - 8 की.मी.अंतरावर  विसापूर हेटी येथील हनुमान मंदिरांतील
हनुमानाचा चांदीच्या मुकुट चोरीला गेल्यामुळे समाजाच्या अध्यक्षांनी गडचिरोली पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिली असुन चोरांचा शोध घ्यावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे.
गडचिरोली वरून तिन कि.मी अंतरावरील विसापूर (कोटगल) हेटी येथे हनुमानाचे मंदिर आहे. आज दिनांक २५ ला दुपारच्या सुमारास हनुमानाचे मुकुट चोरीला गेले असता विसापूर हेटीचे समाजाचे अध्यक्ष प्रफुल कोष्टी ' आकाश कोटगले, हितेश रोहणकार यांनी गडचिरोली पोलीस स्टेशनला रिपोर्ट दर्ज केलेला आहे.
आज दुपारच्या सुमारास गावकरी शेतावर रोवणा करण्याकरीता गेलेले होते. गाव सानसुन होते. चोरट्यांनी याचा फायदा घेऊन अज्ञान इसमानी चांदीचा मुकुटच
चोरून नेला.
देवालयाचे गेट खुले होते. रात्रौच गेट लावल्या जातो असे कोष्टी यांनी सांगीतले. मात्र दुपारच्या सुमारास काही शेतकरी घरी जेवणाकरीता आले असता सदर बाब त्यांच्या लक्षात आली असता सायंकाळी रिपोर्ट देण्यात आली. गडचिरोली पोलीस चोरांचा शोध घेत आहेत.

गडचिरोली : विसापूर हेटी येथील हनुमान मंदिरांतील
हनुमानाचा चांदीच्या मुकुट चोरीला गेल्यामुळे समाजाच्या अध्यक्षांनी गडचिरोली पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिली असुन चोरांचा शोध घ्यावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

Post a Comment

0 Comments