लॉयल्ड्स मेटल्स कंपनी कोनसरी मार्फत बड़ी स्पर्धेचे आयोजन पुरूषांमध्ये चंदनखेड्डी तर स्त्रीयांमध्ये उमरीचा संघ ठरला विजेता

लॉयल्ड्स मेटल्स कंपनी कोनसरी मार्फत बड़ी स्पर्धेचे आयोजन पुरूषांमध्ये चंदनखेड्डी तर स्त्रीयांमध्ये उमरीचा संघ ठरला विजेता

गडचिरोली- 
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी कोनसरी मार्फत ०२मे पासून ०७ मेपर्यंत कब्बडी टूर्नामेंटचे आयोजन केले गेले होते.

नैसर्गिकरीत्या अफाट क्षमता असलेले प्रतिभावन खेळाडू या गडचिरोली जिल्ह्यात असून त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध आले. करून दिल्यास ते स्वतःसोबतच या जिल्ह्याचे, महाराष्ट्राचे नाव खेळांमध्ये पुढे नेतील हा उद्देश ठेवून कर्नल महापात्रा यांच्या संकल्पनेतून लॉयल्ड्स मेटल्स कंपनीमार्फत आयोजित या कबड्डी सामन्यांत पुरुषांमध्ये चंदनखेड्डी संघ विजेता, तर कढोली संघ उपविजेता, तृतीय क्रमांक कोनसरी तर चतुर्थ क्रमांक धर्मपूर या संघाने पटकावला
स्त्रियांच्या गटात उमरी विजेता, छोटी उमरी कोनसरी संघ उपविजेता ठरला. कढोली संघ तृतीय तर अभिलाषा
कोनसरीचा संघ चतुर्थ स्थानावर राहिला. दोन्ही विजेत्या संघांना वीस हजार, उपविजेत्या संघाला पंधरा हजार, तृतीय स्थानावरील संघाला दहा हजार व चतुर्थ स्थानावरील संघाला सुद्धा रोख स्वरूपात बक्षीस व आठही संघांना चषक देऊन सन्मानित करण्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वैयक्तीक रीत्या चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार संजय नागटीळक तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक राठोड, चंदनखेड्डी, उमरी, रामकृष्णपूर, कढोली, मुधोली यासहीत इतर गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य आणि कंपनीच्या मानवी संसाधन विभागाचे उपाध्यक्ष कर्नल महापात्रा व कर्मचारी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments